ETV Bharat / city

परमबीर सिंग यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार- अनिल देशमुख - Anil Deshmukh reaction on Paramvir Singhs allegations

गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सर्व आरोप ट्विटरवरून खोडून काढले आहेत. देशमुख म्हणतात की, मुकेश अंबानी प्रकरणी तसेच मनसुख हिरेन यांच्या हत्या प्रकरणात सचिन वाझेचा सहभाग स्पष्ट होत असताना, त्याचे धागेदारे तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्यापर्यंत पोहचण्याची शक्यता होती.

अनिल देशमुख
अनिल देशमुख
author img

By

Published : Mar 20, 2021, 7:59 PM IST

Updated : Mar 20, 2021, 10:17 PM IST

मुंबई - राज्यात सचिन वाझे प्रकरणावरुन तडकाफडकी बदली केलेल पोलीस अधिकारी परमबीर सिंग आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यातील वाद चव्हाट्यावर आला आहे. परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर प्रत्येक महिन्याला १०० कोटींच्या वसुलीचे टार्गेट दिल्याचा आरोप केला आहे. स्वतःच्या बचावासाठी खोटा आरोप करणाऱ्या परमबीर सिंग यांच्याविरोधात अब्रु नुकसानीचा दावा दाखल करणार असल्याचे गृहमंत्र्यांनी म्हटले आहे.

निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे प्रकरणात मुंबई पोलीस आयुक्तपदावरुन सिंग यांची उचलबांगडी केली होती. बदलीमुळे अस्वस्थ असेलल्या परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर स्वरुपाचे आरोप केले आहेत. वाझे यांना खात्यात घेतल्यानंतर गृहमंत्री देशमुख यांनी प्रत्येक महिन्याला शंभर कोटी रुपयांची वसुली करण्याचे टार्गेट दिले होते, असा खळबळजनक दावा परमबीर सिंग यांनी केला आहे. यासंदर्भातील आठ पानांचे पत्र राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवले आहे. त्यामुळे राज्यातील वातावरण ढवळून निघाले असून घडामोडींनाही वेग आला आहे.

Anil Deshumukh letter
अनिल देशमुख यांचे पत्र

हेही वाचा-अँटिलिया प्रकरणात सचिन वाझेंकडून एनआयएने करून घेतले नाट्य रूपांतर

मात्र, गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सर्व आरोप ट्विटरवरून खोडून काढले आहेत. देशमुख म्हणतात की, मुकेश अंबानी प्रकरणी तसेच मनसुख हिरेन यांच्या हत्या प्रकरणात सचिन वाझेचा सहभाग स्पष्ट होत असताना, त्याचे धागेदारे तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्यापर्यंत पोहचण्याची शक्यता होती. यातून सिंग यांनी स्वतःला वाचविण्यासाठी तसेच पुढील कायदेशीर कारवाईच्या बचावासाठी खोटा आरोप केल्याचे गृहमंत्री देशमुख यांनी ट्विटरद्वारे स्पष्ट केले आहे.

हेही वाचा-गृहमंत्र्यांनी 100 कोटींचे वसुलीचे टार्गेट दिल्याचा परमबीर सिंग यांचा आरोप; अनिल देशमुखांनी 'ही' दिली प्रतिक्रिया

गृहमंत्री प्रसिद्धपत्रक प्रसिद्ध करून परमबीर सिंग यांनी केलेले आरोप खोडून काढले आहेत.

काय म्हटले आहे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ?

  • मुंबईचे माजी पोलीस आयुक्त श्री. परमबीर सिंग यांनी माझ्यावर केलेले आरोप खोटे आहे. स्वतःचा बचाव करण्यासाठी मला आणि महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्यासाठी त्यांनी रचलेले हे षडयंत्र आहे. पुढील महत्त्वाच्या गोष्टींवर मी आपले लक्ष वेधू इच्छितो त्यावरून परमबीर सिंग हे कसे खोटे बोलत आहेत, ही बाब आपल्या लक्षात येईल.
  • सचिन वाझे यांना अटक झाल्यानंतर परमबीर सिंग एवढे दिवस शांत का बसले होते? त्याचवेळी त्यांनी आपले तोंड का उघडले नाही ?
  • आपणास उद्या म्हणजे दिनांक १७ मार्च रोजी पोलीस आयुक्त पदावरून हटविण्यात येणार आहे हे लक्षात आल्यानंतर श्री. परमबीर सिंग यांनी दिनांक १६ मार्चला एसीपी पाटील यांना व्हॉटसअप चॅटवरून काही प्रश्न विचारले. त्यांना अपेक्षित असलेली उत्तरे मिळविली. हा परमबीर सिंग यांच्या मोठ्या कटाचा भाग होता.
  • या चॅटच्या माध्यमातून परमबीर सिंग यांना पध्दतशीरपणे पुरावे जमा करायचे होते. या चॅटवरून उत्तरे मिळविताना परमबीर सिंग किती अधीर झाले होते, हे त्यांच्या चॅटवरून आपल्या लक्षात येईल. परमबीर सिंग हे एसीपी पाटील यांच्याकडून वारंवार वदवून घेत आहेत. याचा अर्थ काय?
  • 18 मार्च रोजी मी माध्यमाच्या कार्यक्रमांमध्ये परमबीर सिंग यांच्याविरुद्ध काही गंभीर स्वरूपाच्या बाबी पुढे आल्यामुळे त्यांना पदावरून हटविले असल्याचे म्हटल्यानंतर परमबीर सिंग यांनी स्वतःला वाचविण्याच्या दृष्टीने 19 मार्च रोजी पुन्हा व्हाट्सअप वर संभाषणाचे पुरावे तयार करण्याचा प्रयत्न केला.
  • पोलीस खात्यातील सर्वांना माहीत आहे की सचिन वाझे व एसीपी संजय पाटील हे परमबीर सिंग यांच्या अत्यंत जवळचे आहेत. 16 वर्षे निलंबित असलेल्या वझे यांना पुन्हा सेवेत घेण्याचा निर्णय परमवीर सिंग यांनी स्वतःच्या अधिकारात घेतला.
  • परमबीर सिंग यांचे आरोप धादांत खोटे आहेत. त्यांनी आपले आरोप सिद्ध करावेत. मी त्यांच्यावर अब्रुनुकसानीचा खटला दाखल करीत आहे.
  • स्वतःला वाचविण्यासाठी परमबीर सिंग यांनी हे खोटे आरोप केले आहेत.
  • सचिन वाझे यांनी जर फेब्रुवारी मध्ये परमबीर सिंह यांना भेटून हे सर्व सांगितल्याचे परमबीर सिंग म्हणतात तर त्याच वेळी त्यांनी का सांगितले नाही. एवढे दिवस शांत का होते?
  • विस्फोटक प्रकरणात आपण अडचणीत येऊ शकतो हे लक्षात आल्यानंतर परमबीर सिंग यांनी असे खोटे आरोप करून सरकारला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला आहे.
  • स्फोटके प्रकरण आणि मनसुख हिरेन यांचा संशयास्पद मृत्यू या गंभीर प्रकरणाचा तपास भरकटविण्यासाठी परमबीर सिंग यांनी रचलेले हे षडयंत्र आहे
  • मुख्यमंत्री यांनी परमबीर सिंग यांच्या आरोपाची निष्पक्ष चौकशी करावी, असेही गृहमंत्र्यांनी म्हटले आहे.

चौकशीमध्ये अक्षम्य चुका झाल्याचा गृहमंत्र्यांनी केला होता आरोप-

मुंबई पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्यानंतर विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांवर टीकेची झोड उठली आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी याबाबत खुलासा केला होता. या प्रशासकीय बदल्या नाहीत. ही एक कारवाई आहे. चौकशीमध्ये अक्षम्य चुका समोर आल्या आहेत. त्यामुळे संबंधित प्रकरणाच्या चौकशीत बाधा येऊ नये, निपक्षपाती चौकशी व्हावी, यासाठी पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्याची माहिती गृहमंत्री देशमुख यांनी दिली. घटनेतील प्रत्येक दोषींवर कारवाई करणार असल्याचेही ते म्हणाले होते.

Last Updated : Mar 20, 2021, 10:17 PM IST

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.