ETV Bharat / city

Anil Deshmukh Case : पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांत अनिल देशमुखांचा प्रभाव - सत्र न्यायालय

अनिल देशमुखांनी 100 कोटी रुपयांच्या कथित वसुली प्रकरणी जामीन मिळावा यासाठी न्यायालयात अर्ज केला ( Anil Deshmukh Case ) होता. मात्र, तो न्यायालयाने फेटाळला आहे. तसेच, तेव्हा देशमुखांचा पोलीस बदल्यांत सहभाग असल्याचे नमूद केले ( Anil Deshmukh Involved Transfer Police Officer ) आहे.

Anil Deshmukh
Anil Deshmukh
author img

By

Published : Mar 19, 2022, 10:03 PM IST

मुंबई - शंभर कोटी रुपयांच्या कथित वसुली प्रकरणी माजी गृहमंत्री सध्या आर्थर रोड जेलमध्ये ( Anil Deshmukh Case ) आहेत. गुरुवारी अनिल देशमुखांनी मुंबई सत्र न्यायालयात जामीन मिळण्यासाठी अर्ज दाखल केला होता. मात्र, तो फेटाळण्यात आला आहे. पण, अनिल देशमुख यांचा पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांत प्रभाव असल्याचे यावेळी न्यायालयाने नमूद केले ( Anil Deshmukh Involved Transfer Police Officer ) आहे.

अनिल देशमुख यांच्या जामीन अर्जावर गुरुवारी विशेष न्यायाधीश आर. एन. रोकडे यांच्यासमोर सुनावणी पार पडली. तेव्हा बदल्या आणि नियुक्तीबाबत पोलीस अधिकाऱ्यांची अनधिकृत यादी देशमुख यांच्या सांगण्यावरून तयार केली जायची. ती पोलीस आस्थापना मंडळाकडे पाठवली जायची. मंडळाने तयार केलेल्या अंतिम यादीत देशमुखांकडून प्राप्त शिफारशी समाविष्ट केल्या जात होत्या. प्रथमदर्शनी देशमुख मनी लॉड्रिंग कामात सहभागी असल्याचे पुरावे आहेत, असे न्यायालयाने स्पष्ट केले.

नेमकं प्रकरण काय?

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी अनिल देशमुख यांच्यावर निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे याच्याकडून 100 कोटींची वसुली केल्याचा आरोप केला होता. या प्रकरणी ईडीने तपास करत अनिल देशमुख यांच्या घर आणि कार्यालयावर छापे टाकले होते. ईडीच्या अटकेची कारवाई टाळण्यासाठी देशमुख यांनी उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. पण, न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळून लावली होती. अखेर अनिल देशमुख ईडी कार्यालयात हजर झाले आणि चौकशीअंती त्यांना अटक करण्यात आली.

हेही वाचा - Thane Crime News : धुळवडीचा रंग बेरंग; ठाण्यात तरुणाच्या डोक्यात टाकला दगड

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.