ETV Bharat / city

Vidhan Parishad Election 2022 : विधानपरिषदेला देशमुख, मलिकांना मतदानाची परवानगी मिळणार?, कायदेतज्ञ म्हणतात... - विधानपरिषदेला मतदानासाठी नवाब मलिक उच्च न्यायालयात

विधानपरिषद निवडणूक 20 जून रोजी पार ( Vidhan Parishad Election 2022 ) पडणार आहे. या निवडणुकीत नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांनी मतदान करण्यासाठी न्यायालयात अर्ज केला ( Anil Deshmukh Nawab Malik Petition High Court ) आहे. मात्र, या दोन प्रतिनिधींना मतदान करता येते की नाही याबाबत कायदेतज्ञ काय म्हणतात हे जाणून घेणार आहोत.

nawab malik anil deshmukh
nawab malik anil deshmukh
author img

By

Published : Jun 15, 2022, 9:04 PM IST

मुंबई - विधानपरिषद निवडणूक 20 जून रोजी होणार ( Vidhan Parishad Election 2022 ) आहे. या निवडणुकीमध्ये 10 जागेसाठी महाविकास आघाडी आणि भाजपामध्ये अटीतटीची लढत पाहायला मिळणार आहे. या निवडणुकीत प्रत्येक मत महत्त्वाचे असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री अनिल देशमुख ( Anil Deshmukh ) आणि मंत्री नवाब मलिक ( Nawab Malik ) न्यायालयीन कोठडीत असल्याने त्यांना मतदानासाठी परवानगी देण्यात यावी याकरिता उच्च न्यायालयात अर्ज देखील करण्यात आलेला आहे. राज्यसभा निवडणुकीमध्ये मलिक आणि देशमुखांना परवानगी न दिल्याने महाविकास आघाडीला मोठा फटका बसला असून, एक उमेदवार पराभूत झाला आहे. त्यामुळे विधानपरिषदेत देखील या दोन मतांना महत्त्व असल्याने आता उद्या उच्च न्यायालय परवानगी देते की नाही यावर महाविकास आघाडीचे पुढील भवितव्य अवलंबून असणार आहे. मात्र, कायद्यामध्ये दिलेल्या तरतुदीनुसार महाविकास आघाडीचा हा प्रवास काहीसा खडतर होण्याची चिन्ह दिसत ( Anil Deshmukh Nawab Malik Petition High Court ) आहे.

विधान परिषद निवडणुकीमध्ये आमदारांचे संख्याबळ पाहता भाजपा आणि काँग्रेसमध्ये आमदार निवडून आणण्यासाठी थेट लढत पाहायला मिळत आहे. भाजपाला पाचवा उमेदवार निवडून आणण्याकरिता 22 मतांची आवश्यकता आहे, तर काँग्रेसला 10 मतांची आवश्यकता आहे. शिवसेना ( Shivsena ) आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ( National Congres Party ) दोन्ही उमेदवार त्यांच्याकडे असलेल्या उपलब्ध आमदारांच्या जोरावर निवडणून येतील. राज्यसभा निवडणुकीमध्ये महाविकासआघाडीचा झालेला पराभव पाहता सावध पवित्रा घेण्यात आला असून, भाजपाचा उमेदवार टाळण्याकरिता रणनीती आखण्यात आली आहे. विधान परिषद निवडणुकीमध्ये उमेदवार विजयी होण्यासाठी भाजपा आणि महाविकास आघाडी दोघांनाही अपक्ष आमदारांची मदत लागणार आहे. त्यामुळे आता घोडेबाजार होणार हे स्पष्ट आहे. विधानसभेत 13 अपक्ष आमदार तर छोट्या पक्षांचे 16 आमदार आहेत. राष्ट्रवादीचे 53 आमदार असून, अनिल देशमुख आणि नवाब मलिक हे तुरुंगात आहेत. त्यांना मतदानासाठी परवानगी मिळावी यासाठी राष्ट्रवादीने न्यायालयात अर्ज केला आहे. विधानसभेत शिवसेनेचे 56 आमदार होते. शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांचे दुबईत नुकतेच निधन झाल्याने शिवसेनेच्या आमदारांची संख्या 54 वर आली आहे. विधानसभेत काँग्रेसचे 44 आमदार आहेत.

अत्यंत चुरशीच्या होणाऱ्या या निवडणुकीत अपक्ष आमदारांचे महत्व वाढले असतानाच सर्व पक्षांना स्वपक्षाच्या आमदारांचे एक-एक मतही महत्वाचे बनले आहे. अशातच आता राष्ट्रवादी काँग्रेसची दोन मत धोक्यात आली आहेत. कारण राष्ट्रवादीचे अनिल देशमुख आणि नवाब मलिक हे दोन आजी-माजी मंत्री आणि आमदार सध्या तुरुंगात आहेत. या दोघांनाही मतदान करता येणार की नाही याबाबत सध्या कोणतीही स्पष्टता नाही.

लोकप्रतिनिधी कायदा 1951 च्या नियम क्रमांक 62 (5) नुसार जे आमदार तुरुंगात शिक्षा भोगत आहेत. त्यांच्याविरोधातील सुनावणी न्यायप्रविष्ट असेल आणि त्यावेळी ते कारागृहात असतील अथवा संबंधित आमदार पोलीस कोठडीत असताना त्यांना कोणत्याही निवडणुकीसाठी मतदान करता येणार नाही. मात्र, न्यायालयाने परवानगी दिल्यास मतदान करता येत असल्याचेही काही घटनांमध्ये दिसून आले आहे.

मागच्या काळातही अशा काही घटना घडलेल्या आहेत. फडणवीस सरकारच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेसचे मोहोळचे तत्कालीन आमदार रमेश कदम आणि छगन भुजबळ हे मतदानासाठी विधीमंडळात आले होते. त्यामुळे मलिक आणि देशमुखांच्या मतदानासाठी आम्ही मोठ्या कसोशीने कामाला लागलो आहोत. 27 एप्रिल 2019 रोजी निवडणूक आयोगाने आपले नियम अद्ययावत करुन नवीन नियमावली आपल्या वेबसाईटला टाकली आहे. राज्यसभा निवडणुकीमध्ये मलिक आणि देशमुख यांना मतदान करण्याची परवानगी देण्यात आली नव्हती. त्यामुळे महाविकास आघाडीला मोठा फटका देखील बसला आहे. त्यामुळे पुन्हा विधान परिषद निवडणुकीमध्ये नवाब मलिक आणि अनील देशमुख यांना परवानगी मिळावी, याकरिता गुरुवारी ( 16 जून ) मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. याबद्दल कायदेशीर पेच निर्माण होवू शकतो.

राज्यघटनेमध्ये 62 (5) मध्ये अटकेत असलेल्या आरोपीला मतदान करिता परवानगी देण्यात येऊ नये असे आहे. तरी मुंबई उच्च न्यायालयाने छगन भुजबळ आणि रमेश कदम यांना मतदानाकरिता परवानगी देण्यात आली होती. त्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाला हा अधिकार आहे की अटकेत असलेल्या आरोपीला मतदाना करिता परवानगी देण्याचा अधिकार असल्याने विधान परिषदेमध्ये मलिक आणि देशमुख यांना परवानगी मिळण्याची शक्यता, असे कायदेतज्ञांनी वकील असीम सरोदे यांनी म्हटले आहे.

विधान परिषद निवडणूक उमेदवार -

भाजपाचे उमेदवार -

1.प्रवीण दरेकर
2.श्रीकांत भारतीय
3.राम शिंदे
4.उमा खापरे
5. प्रसाद लाड

शिवसेनाचे उमेदवार -

1. सचिन अहिर
2. आमशा पाडवी

राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार -

1. रामराजे निंबाळकर
2. एकनाथ खडसे

काँग्रेसचे उमेदवार -

1. भाई जगताप
2. चंद्रकांत हंडोरे

विधानसभेतील संख्याबळ -

शिवसेना -54
राष्ट्रवादी-53
काँग्रेसचे -44
बहुजन विकास आघाडी - 3
समाजवादी पार्टी - 2
एमआयएम - 2
प्रहार जनशक्ती पक्ष - 2
कम्युनिस्ट पक्ष - 1
स्वाभिमानी शेतकरी संघटना - 1
मनसे - 1
राष्ट्रीय समाज पक्ष - 1
क्रांतीकारी शेतकरी पक्ष - 1
जनसुराज्य शक्ती - 1
शेतकरी कामगार पक्ष - 1
अपक्ष -13

महाविकास आघाडीकडे एकूण 169 आमदार - बहुजन विकास आघाडी 3, समाजवादी पक्ष 2, प्रहार जनशक्ती पक्ष 1, स्वाभिमानी शेतकरी संघटना 1 ,शेकाप 1 ,क्रांतीकारी शेतकरी पक्ष 1, कम्युनिस्ट पक्ष 1 आणि 8 अपक्ष आमदार महाविकास आघाडीसोबत आहेत.

भाजपाकडे एकूण 113 आमदार -

भाजपबरोबर जनसुराज्य पक्ष 1, राष्ट्रीय समाज पक्ष 1 आणि 5 अपक्ष आमदार आहेत.त्यामुळे भाजपकडे 113 आमदार आहेत.

हेही वाचा - Deshmukh Maliks petition to vote : देशमुख मलिकांच्या विधान परिषद निवडणुकीतील मतदान परवानगी याचिकेवर उद्या सुनावणी

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.