मुंबई - हृदयविकारासारख्या गंभीर आजारात प्रचलित अँजिओग्राफी तपासणी हीच उत्तम पर्याय आहे. सिटी अँजिओग्राफीमुळे अचूक निदान करता येत नाही, असे मत जे जे रुग्णालयाचे अधीक्षक डॉक्टर संजय सुरासे यांनी व्यक्त केलं आहे.
हृदयविकार तपासणीसाठी अनेक तपासणी पद्धतींचा वापर केला जातो. यामध्ये ईसीजी, टू डी इको, स्ट्रेस टेस्ट आणि अँजिओग्राफी यांचा समावेश आहे. हृदयविकाराने बाधित असलेल्या व्यक्तींची तपासणी करण्यासाठी रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉकेजेस आहेत का हे पाहण्यासाठी अँजिओग्राफी केली जाते. मात्र, खर्चिक असलेल्या अँजिओग्राफी पेक्षा सिटी अँजिओग्राफी ही कमी खर्चाची तपासणी पद्धती अवलंबिली गेली पाहिजे, असे मत काही तज्ञ डॉक्टरांकडून व्यक्त केले जात आहे. या तपासणी पद्धतीमध्ये सिटीस्कॅन प्रमाणेच हृदयाची तपासणी केली जाते. ज्यामुळे ब्लॉकेजेसचा अंदाज येतो. त्यामुळे अन्य खर्चिक तपासणी करण्याची गरज नाही, असे काही तज्ञांचे मत आहे.
अँजिओग्राफी हीच उत्तम - अँजिओग्राफी ही तपासणी पद्धती प्रचलित असून, या पद्धतीद्वारे रुग्णाच्या हृदयातील ब्लॉकेजेस अचूक निदान करता येते. सिटी अँजिओग्राफीमध्ये केवळ प्राथमिक स्वरूपाची माहिती मिळू शकते. मात्र, अँजिओग्राफीच्या दरम्यान जर रुग्णाला हृदयविकाराचा झटका आल्यास त्याला ताबडतोब अँजिओप्लास्टीचा उपचार देता येतो. त्यामुळे हीच उपचार पद्धती योग्य असल्याचे मत जे जे रुग्णालयाचे अधीक्षक डॉक्टर संजय सुरासे यांनी व्यक्त केलं आहे.
हेही वाचा - Super Food Garlic : सुपरफूड आहे कडू-तुरट काळा लसूण; जाणून घ्या त्याचे असंख्य फायदे