ETV Bharat / city

अंधेरी पूर्व ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांची मुंबई उच्च न्यायालयात धाव

ऋतुजा लटके यांचा महापालिकेने राजीनामा मंजूर न केल्याने या विरोधात त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. मुंबई महानगरपालिकेने ऋतुजा लटके महापालिकेत परिमंडळ उपायुक्तांच्या कार्यालयात कार्यरत आहेत. ऋतुजा लटके यांनी एक महिना अगोदर दिलेल्या राजीनामा अद्यापही मंजूर न केल्याने उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

ऋतुजा लटके
ऋतुजा लटके
author img

By

Published : Oct 12, 2022, 2:04 PM IST

Updated : Oct 12, 2022, 5:14 PM IST

मुंबई - ऋतुजा लटके यांचा महापालिकेने राजीनामा मंजूर न केल्याने या विरोधात त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. मुंबई महानगरपालिकेने ऋतुजा लटके महापालिकेत परिमंडळ उपायुक्तांच्या कार्यालयात कार्यरत आहेत. ऋतुजा लटके यांनी एक महिना अगोदर दिलेल्या राजीनामा अद्यापही मंजूर न केल्याने उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. नितीन जामदार यांच्या खंडपीठासमोर याची सुनावणी होणार आहे. ऋतुजा लटके यांची बाजू वकील विश्वजित सावंत मांडणार आहेत. दुपारी 2-30 वाजता याचिका तातडीने सुनावणी घेण्याची मागणी ठाकरे गट करणार आहे.

( Andheri East Assembly By Election ) सध्या राज्यभरात अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणूक चर्चेचा विषय ठरली आहे. या निवडणुकीत कोण बाजी मारणार यासाठी शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि भारतीय जनता पक्षाने आपली कंबर कसली असतानाच आता या निवडणुकीत "बाळासाहेबांची शिवसेना" पक्षाने देखील उडी घेतली आहे. "शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे" पक्षाच्या अधिकृत उमेदवार शिवसेनेच्या दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके आहेत. त्यांनी शिंदेगटाकडून निवडणूक लढवावी असा शिंदे गटाकडून दबाव टाकला ( Shinde group to pressure on Rituja Latke ) जात असल्याचा आरोप उद्धव ठाकरे गटाकडून केला जात आहे.

शिंदे गटाकडून दबाव - महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून ऋतुजा लटके यांना घोषित देखील केलं गेले. मात्र ऋतुजा लटके यांना एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेबांची शिवसेना पक्षाकडून उमेदवारी देण्याचा प्रयत्न मुख्यमंत्र्यांचा सुरू असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. तसेच ऋतुजा लटके यांना एकनाथ शिंदे गटाकडून उमेदवारी घ्यावी, यासाठी दबाव टाकला जात असल्याचे आरोप "शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे" या पक्षाकडून केला जातोय.

कोर्टात जाण्याचा इशारा - मुंबईतील अंधेरी पूर्व येथे असलेल्या महानगरपालिकेच्या कार्यालयात ऋतुजा लटके लिपिक म्हणून कार्यरत होत्या. त्यांनी आपला पदाचा राजीनामा रीतसर दिल्यानंतरही एका आयुक्त त्यांचा राजीनामा स्वीकारत नाहीत. शिल्लक कारण देऊन केवळ दिवस पुढे ढकलण्याचा काम पालिकेकडून सध्या सुरू आहे. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी केवळ दोन दिवस उरले असल्यामुळे आता या मुद्द्यावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष कोर्टात जाणार असल्याचा इशारा उद्धव ठाकरे गटाचे नेते अनिल परब ( Anil parab ) यांनी दिला आहे.

ऋतुजा लटके ठाकरे गटातच - एकनाथ शिंदे गटाकडून ऋतुजा लटके यांना आपल्या बाजूला आणण्यासाठी अमिषा दाखवली जात आहेत त्यांच्यावर दबाव टाकला जात आहे मात्र दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके आणि त्यांचे पूर्ण कुटुंब हे उद्धव ठाकरे यांच्याशी एकनिष्ठ आहे. मुख्यमंत्र्यांनी दबाव टाकण्याचा कितीही प्रयत्न केला तरी ऋतुजा लटके या उद्धव ठाकरे यांच्या सोबतच राहतील असेही अनिल परब ( Anil parab ) यांनी स्पष्ट केल आहे.

Last Updated : Oct 12, 2022, 5:14 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.