मुंबई - सध्या राज्यासह देशात कोरोना विषाणूच्या प्रसारामुळे लॉक डाऊन सुरु आहे. या परस्थितीवर आम्ही जगावं कसं व सरकारकडे कलावंत, सैनिक, पोलीस डॉक्टर, नर्स यांच्या व्यथा सांगणारे गीत गायक आनंद शिदे यानी सोलापूर जिल्ह्यातील एका खेडेगावातुन समर्पित केले आहे. हे गीत सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
यावेळी सुप्रसिद्ध गायक शिंदे म्हणाले की, आज कोरोना विषाणू ने संपूर्ण जगात, देशात तसेच राज्यात थैमान घातले आहे. यात लॉकडाऊन परिस्थितीत केंद्र आणि राज्य सरकारच्या वतीने कलम 144 अन्वये संचारबंदी कर्फ्यु लागू केला आहे. त्यामुळे सैनिक तसेच गृह विभागाचे पोलीस, होमगार्ड कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी 24 तास डोळ्यात तेल ओतून ड्युटी बजावत आहेत. कोरोना विषाणू संसर्ग झालेल्या रुग्णांना कोरोना च्या जबड्यातून बाहेर काढण्यासाठी डॉक्टर, नर्स अहोरात्र क्योरनटाइन कक्ष, विलगीकरण कक्ष (आयसोलेशन वॉर्ड) मध्ये मेहनत घेत आहेत. दुसरी कडे सार्वजनिक आरोग्य विभागातील कर्मचारी, अग्निशमन दलाचे कर्मचारी, शहर, नगरे, गावे निर्जंतुकीकरण करण्यासाठी औषध फवारणी करत आहेत.