ETV Bharat / city

Mumbai Traffic Jam : अमृता फडणवीसांचा दावा, 'ट्राफिक जॅममुळे मुंबईत घटस्फोट', प्रत्यक्षात परिस्थिती वेगळीच.. - वाहतूक कोंडी सोडवण्यासाठीचा महापालिकेचा प्लॅन

'मुंबईत ट्राफिक जॅममुळे ३ टक्के घटस्फोट होतात', असं वक्तव्य विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता यांनी केलं ( Amruta Fadnavis Mumbai Trafic Jam Statement ) होत. त्यांच्या या वक्तव्याचा समाचार महापौरांनी घेतलाय. महापालिकेतर्फे वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी प्लॅन तयार ( BMC Plan To Solve Traffic Congestion ) केलाय. तर घटस्फोटासंदर्भात कार्य करणाऱ्या सामाजिक संस्थेने आतापर्यंत या कारणावरून घटस्फोटाचे प्रकरण आले नसल्याचं सांगितलं आहे. पाहुयात कशी आहे मुंबईतील प्रत्यक्षात परिस्थिती..

फडणवीसांचा दावा, 'ट्राफिक जॅममुळे मुंबईत घटस्फोट', प्रत्यक्षात परिस्थिती वेगळीच..

author img

By

Published : Feb 5, 2022, 7:28 PM IST

मुंबई : शुक्रवारी ( दि. ४ ) विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीसांच्या पत्नी अमृतांनी केलेल्या दाव्यामुळे राज्यात वादाला तोंड फुटले आहे. मुंबईत वाहतूक कोंडीमुळे ३ टक्के लोकांचे घटस्फोट होत असल्याचं त्या म्हणाल्या ( Amruta Fadnavis Mumbai Trafic Jam Statement ) . त्यामुळे मुंबईतील वाहतूक कोंडीचा प्रश्न ऐरणीवर आला असून, प्रत्यक्षात नेमकी काय परिस्थिती आहे याचा आढावा ईटीव्ही भारतने घेतलाय. तर पाहुयात काय आहेत मुंबईतील वाहतूक कोंडीची कारणे ( Reason Behind Traffic Jam In Mumbai ), वाहतूक कोंडी सोडवण्यासाठीचा महापालिकेचा प्लॅन ( BMC Plan To Solve Traffic Congestion ), खरंच वाहतूक कोंडीमुळे घटस्फोट होत आहेत का? ( Are There Really Divorces Due To Traffic Congestion? ) आणि यावर व्यक्त झालेली राजकीय प्रतिक्रिया..

मुंबईतील वाहतूक कोंडीचे कारण

दररोज सकाळी कार्यालय गाठण्यासाठी तर, सायंकाळी घराच्या दिशेने रवाना होणाऱ्या लाखो चाकरमान्यांची गर्दीची वेळच मुंबईतील रस्ते वाहतूक कोंडीस कारणीभूत ठरताना दिसत आहे. त्यात विकासकामांमुळे अरुंद झालेले महामार्ग कोंडीत भर घालत आहेत. कार्यालयीन वेळेत बदल करण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला कॉर्पोरेट कंपन्यांसह मार्केटवासियांनी बगल दिल्याने ही कोंडी सुटण्याचे नाव घेत नसल्याचे वाहतूक तज्ज्ञ सुभाष गुप्ता सांगतात.

इंधनावर सरासरी ३०० रुपयांचा खर्च

मुंबई विद्यापीठातील अर्थशास्त्र विभागाने एक सांशोधन केले होते. ज्यात मुंबईतील काही परिसरातील पाहणी केली होती. त्यानुसार इंधन खर्च दोनशे, टोल, गाडीची देखभाल, पार्किंग असा खर्च याचा विचार केला तर, मुंबईत सरासरी दररोज ३०० रुपये एका गाडीवर खर्च होत आहेत. त्यामुळे वाहतूक कोंडीतून सुटण्यासाठी आणि पैशांची बचत करण्यासाठी सार्वजनिक वाहतुकीचा मार्ग स्वीकारून गरजेचे आहेत.

३५ लाख वाहने

मुंबईची लोकसंख्या सुमारे एक कोटी ३० लाख इतकी आहे. शहराचं क्षेत्रफळ सुमारे ४३८ चौरस किलोमीटर आहे. मुंबईत सध्या सुमारे ३५ लाख वाहने असून प्रति हजार व्यक्ती ३६१ जणांकडे स्वतःचे खासगी वाहन ( 35 Lakh Vehicles In Mumbai ) आहे. सुमारे दोन हजार किलोमीटर लांबीचे रस्त्यांचे जाळे आहे.

वाहतूक कोंडी सोडवण्यासाठीचा महापालिकेचा प्लॅन

मुंबईकर १० तास कामानिमित्त घराबाहेर असतात. अशावेळी त्यांच्या राहत्या घराखाली पार्किंगमध्ये कोणतीही गाडी पार्क नसते. या कालावधीत हौसिंग सोसायटीबरोबर करार करून अशा जागा पार्किंगसाठी उपलब्ध केल्या जातील. पालिकेचे स्वतःचे पार्किंग तळ आणि सोसायट्यांमधील रिक्त असलेले पार्किंग लॉट याद्वारे सुमारे ५० लाख पार्किंग लॉट उपलब्ध करून दिले जातील. हे सर्व पार्किंग लॉट एका ॲपवर आणून नागरिकांना ज्या विभागात काम आहे त्याच्या जवळचे पार्किंग लॉट उपलब्ध करून दिले जातील. यासाठी मुंबई महापालिकेच्या २४ पैकी ३ विभागांत पायलट प्रकल्प सुरू केला जाणार असल्याची माहिती आयुक्तांनी दिली.

ट्राफिकमुळे घटस्फोटाची तक्रार नाही

या संदर्भात बोलताना कोरो संस्थेच्या संभवी महाडिक म्हणाल्या की, हे विधान अमृता फडणवीस यांनी कोणत्या आधारे केलं? त्यासंदर्भात त्यांच्याकडे काय माहिती आहे हे अजून त्यांनी स्पष्ट केलेले नाही. आमच्याकडे ज्या तक्रारी येतात त्यामध्ये एकमेकांना वेळ न देण, पैशांची अडचण, कौटुंबिक हिंसाचार, घरातील वाद विवाद, दोघांमध्ये संवाद नसणं, मुलांना न सांभाळणं, एकमेकांना समजून न घेणं अशा प्रकारच्या तक्रारी आमच्याकडे येत असतात. पण, अद्यापही आमच्याकडे मुंबईतल्या ट्राफिकमुळे घटस्फोटाची मागणी करणारी कोणतीही तक्रार आमच्याकडे आलेली नाही.'

महापौरांची टीका

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी अमृता फडणवीस ( Kishori Pednekar Critisized Amruta Fadnavis ) यांच्यावर टीका केली आहे. त्यांनी हा जावईशोध कुठून लावला, असे त्या म्हणाल्या. ज्याचे त्याचे क्षेत्र आहे, त्याने त्या क्षेत्रात काम करावे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.