ETV Bharat / city

महाराष्ट्रासह मुंबईला स्वच्छतेचे प्रथम पारितोषिक मिळाले पाहिजे - अमृता फडणवीस

देशात स्वच्छ भारत अभियान राबविण्यात येते. त्यात इंदूर शहराचा पाहिला क्रमांक येतो. हा पुरस्कार मुंबई आणि महाराष्ट्राला मिळावा यासाठी आजपासून स्वच्छ्ता अभियान राबवण्यात येत आहे. यात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी केले आहे.

अमृता फडणवीस
अमृता फडणवीस
author img

By

Published : Sep 26, 2022, 5:39 PM IST

Updated : Sep 26, 2022, 6:51 PM IST

मुंबई - देशात स्वच्छ भारत अभियान राबविण्यात येते. त्यात इंदूर शहराचा पहिला क्रमांक ( Amrita Fadnavis on Swachata abhiyan in Mumbai ) येतो. हा पुरस्कार मुंबई आणि महाराष्ट्राला मिळावा यासाठी आजपासून स्वच्छ्ता अभियान राबवण्यात ( cleanliness first prize for Mumbai ) येत आहे. यात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी केले आहे. परिस्थिती पाहून रात्री १२ वाजेपर्यंत परवानगी दिली पाहिजे, असे मत फडणवीस यांनी व्यक्त केले.

मुंबई महाराष्ट्राला पुरस्कार हवा -बृहन्मुंबई महानगरपालिका व दिव्याज फाउंडेशन ( Divyaj foundation Mumbai ) यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक पर्यटन दिनानिमित्त स्वच्छ भारत अभियानांतर्गत स्वच्छता मोहीम गेटवे ऑफ इंडिया येथे राबवण्यात आली. यावेळी अमृता फडणवीस आणि त्यांची मुलगी दिव्याज तसेच मंत्री मंगल प्रभात उपस्थित होते. यावेळी फडणवीस बोलत होत्या. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना अमृता फडणवीस म्हणाल्या, की आजपासून नवरात्रीचे पर्व सुरू होत आहे. यावेळी स्वच्छतेला महत्त्व दिले जाते. घराप्रमाणे आपल्या आजूबाजूच्या परिसराला स्वच्छ ठेवण्याची गरज आहे. स्वच्छतेत लक्ष्मी आणि सरस्वतीचा निवास आहे. यासाठी मुंबईत येणारा समुद्र मार्ग म्हणून गेट वे ऑफ इंडिया येथे स्वच्छ्ता मोहिम राबवली आहे. दिव्याज फाउंडेशनने त्यात सहभाग घेतला आहे. महाराष्ट्राला सर्वात स्वच्छ राज्य आणि मुंबईला सर्वात स्वच्छ शहर म्हणून पारितोषिक मिळायला पाहिजे. त्यासाठी आपण सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन अमृता फडणवीस यांनी केले आहे. स्वच्छतेचा हा उपक्रम राबवल्याने मंत्री मंगलप्रभात लोढा आणि पर्यटन विभागाचे विशेष आभार अमृता फडणवीस यांनी मानले आहेत.

मुंबईला स्वच्छतेचे प्रथम पारितोषिक मिळाले पाहिजे
परिस्थिती बघून सरकारने निर्णय घ्यावा - राज्य सरकारकडून माता सुरक्षित ( Amrita Fadnavis on Garba permission ) अभियान राबवण्यात आले आहे. त्याबाबत बोलताना, फडणवीस म्हणाल्या, की माता सर्वांना जन्म देते. ती सुदृढ राहायला पाहिजे. ती शिक्षित असायला पाहिजे. तसेच गरबा रात्री १२ वाजेपर्यंत खेळला जाणार असेल तर मला आनंद आहे. मीसुद्धा गरबा खेळते. पण सुरक्षितता आणि परिस्थिती बघून सरकारने निर्णय घेतला पाहिजे असे फडणवीस म्हणाल्या आहेत.

Last Updated : Sep 26, 2022, 6:51 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.