ETV Bharat / city

Amravati Chemist Murder : उमेश कोल्हे प्रकरणाची गृहमंत्रालयाकडून दखल; तपास एनआयएकडे वर्ग - उमेश कोल्हे हत्या प्रकरणाची गृहमंत्री अमित शहांकडून दखल

अमरावतीत एका 54 वर्षीय व्यक्तीची हत्या करण्यात ( Amravati Chemist Murder ) आली आहे. उमेश कोल्हे असं त्या व्यक्तीचं नाव आहे. त्याप्रकरणाचा तपास आता एनआयकडे वर्ग करण्यात आला ( Umesh Kolhe Murder Case To NIA ) आहे.

umesh kolhe
umesh kolhe
author img

By

Published : Jul 2, 2022, 3:29 PM IST

Updated : Jul 2, 2022, 4:44 PM IST

मुंबई - अमरावतीत एका 55 वर्षीय व्यक्तीची हत्या करण्यात आली ( Amravati Chemist Murder ) आहे. उमेश कोल्हे असं त्या व्यक्तीचं नाव आहे. नुपूर शर्माच्या समर्थनार्थ पोस्ट केल्यानं ही हत्या केल्याचा आरोप भाजपनं केला आहे. त्यानंतर आता याप्रकरणाची दखल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घेतली आहे. याप्रकरणचा तपास आता एनआयकडे वर्ग करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गृहमंत्री कार्यालयाकडून याबाबत ट्विट करुन माहिती देण्यात आली ( Umesh Kolhe Murder Case To NIA ) आहे.

शहरातील उमेश कोल्हे ( रा. घनश्यामनगर ) या मेडिकल व्यावसायिकाची चाकून गळा चिरुन हत्या करण्यात आली होती. 21 जून रोजी ही धक्कादायक घटना घडली होती. कोल्हे यांचे तहसील कार्यालय परिसरात मेडिकल स्टोअर्स आहे. मंगळवारी रात्री त्यांनी मेडिकल स्टोअर्स बंद केले. त्यानंतर ते मुलगा संकेत (२७) व सून वैष्णवी यांच्यासोबत घरी जायला निघाले. समोर एका दुचाकीवर उमेश तर मागे दुसऱ्या दुचाकीवर मुलगा संकेत व त्यांची पत्नी वैष्णवी जात होते. न्यू हायस्कूल मेन समोरील गल्लीतून जात असताना एका दुचाकीजवळ तीन जण उभे होते. त्यातील एकाच्या हातात चाकू होता. ते तिघेही अचानक उमेश यांच्या दुचाकीच्या आडवे झाले.

  • MHA has handed over the investigation of the case relating to the barbaric killing of Shri Umesh Kolhe in Amravati Maharashtra on 21st June to NIA.

    The conspiracy behind the killing, involvement of organisations and international linkages would be thoroughly investigated.

    — गृहमंत्री कार्यालय, HMO India (@HMOIndia) July 2, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

तिघांपैकी एकाने केला गळ्यावर वार - त्यामुळे उमेश यांनी दुचाकी थांबविली. यावेळी काही कळण्याआधीच तिघांपैकी एकाने चाकूने उमेश यांच्या गळ्यावर वार केला तर ईतरांनीही मारहान करण्यास मदत केली. त्यामुळे उमेश हे दुचाकीसह खाली कोसळले. हा प्रकार त्यांच्या मागे येत असलेल्या मुलगा संकेत व सून वैष्णवी यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी दुचाकी थांबवून आरडाओरड केली. त्यामुळे तिनही मारेकरी दुचाकीने तेथून पळून गेले. त्यानंतर संकेत व वैष्णवी यांनी परिसरातील नागरिकांच्या मदतीने उमेश यांना खासगी रुग्णालयात दाखल केले. परंतु, उपचारादरम्यान काही वेळातच उमेश यांची प्राणज्योत मालवली. त्यानंतर घटनेची माहिती कोतवाली पोलिसांना देण्यात आली.

पाच जणांना अटक - या प्रकरणी पोलिसांनी अतिफ राशीद आदिल रशीद ( वय, २४ रा. मौलाना आझाद कॉलनी), मुदस्सीर अहेमद शेख इब्राहिम ( वय २२, रा. बिसमिल्लानगर ), शाहरूख पठाण हिदायत खान ( वय२४, रा. सुफियाननगर), अब्दुल तौफिक उर्फ नानू शेख तसलिम ( वय, २४ रा. बिसमिल्लानगर ) आणि शोएब खान उर्फ भुऱ्या वल्द साबीर खान (वय २२, रा. यास्मीननगर ), अशा पाच जणांना आतापर्यंत अटक करण्यात आली आहे.

हेही वाचा - Medical Professionals Murder : मेडिकल व्यावसायिकाची निघृर्ण हत्या, नुपूर शर्मा प्रकरणाचा संशय?

Last Updated : Jul 2, 2022, 4:44 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.