ETV Bharat / city

प्रताप सरनाईक यांचे निकटवर्तीय अडचणीत...अमित चांदोले यांना २९ नोव्हेंबरपर्यंत ईडीची कोठडी - अमित चांदोले ईडी कोठडी

ईडीने  गुरुवारी अमित चांदोले यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. तब्बल १२ तास चौकशी केल्यानंतर अखेर ईडीने त्यांना अटक केली.

ईडी
ईडी
author img

By

Published : Nov 26, 2020, 8:50 PM IST

Updated : Nov 26, 2020, 9:31 PM IST

मुंबई- मनी लाँड्रिगप्रकरणी ईडीने अटक केलेल्या अमित चांदोले यांच्यासमोरील अडचणीत वाढ झाली आहे. त्यांना २९ नोव्हेंबरपर्यंत ईडीच्या कोठडीत पाठविण्यात आले आहे. चांदोले हे टॉप्स सिक्युरिटीमधील वरिष्ठ अधिकारी आहेत.

ईडीने गुरुवारी अमित चांदोले यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. तब्बल १२ तास चौकशी केल्यानंतर अखेर ईडीने त्यांना अटक केली. टॉप सिक्युरिटी कंपनीकडून एमएमआरडीएला सुरक्षा रक्षक पुरविण्याचे काम केले जात होते.

हेही वाचा-'टॉप सिक्युरिटी'मधील अधिकाऱ्याला ईडीकडून अटक; प्रताप सरनाईकांचे आहेत निकटवर्तीय

प्रताप सरनाईकांचे बालपणीचे मित्र..

अमित चंदोले हे प्रताप सरनाईकांचे बालपणीचे मित्र आहेत. या दोघांनी मिळून काही व्यवसाय सुरू केले होते. तसेच प्रताप सरनाईकांच्या कित्येक व्यवसायांमध्ये चंदोले हे भागीदार आहेत. टॉप सिक्युरिटी आणि विहंग ग्रुप या कंपन्यांमधील दुवा म्हणजेच अमित चंदोले असे बोलले जाते. 'टॉप सिक्युरिटी' एजन्सीमध्ये महत्त्वाच्या पदावर असणाऱ्या अमित चंदोले यांना १७५ कोटी रुपयांच्या गैरव्यवहार प्रकरणी अटक करण्यात आली आहे. ईडी मार्फत ही कारवाई करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, अटक करण्यात आलेले अमित चंदोले हे शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांचे निकटवर्तीय मानले जातात. तसेच, सरनाईक यांच्या विहंग ग्रुप ऑफ कंपनीजच्या संचालकपदीही अमित चंदोले आहेत.

हेही वाचा-प्रताप सरनाईक ईडी छापा प्रकरण : ईटीव्हीने घेतलेला आढावा...

Last Updated : Nov 26, 2020, 9:31 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.