ETV Bharat / city

Shiv Sena Vs Shinde Group मुख्यमंत्र्यांच्या सभेसाठी पैसे देऊन गर्दी जमवण्यासाठी रेट कार्ड ? अंबादास दानवेंचा आरोप

Shiv Sena Vs Shinde Group मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उद्या संभाजीनगर, पैठणला सभा आहे. Shiv Sena Vs Shinde Group मात्र काही दिवसापूर्वी एकनाथ शिंदे गटाचे आमदार आणि मंत्री संदिपान भुमरे यांच्या सभेला खुर्च्या रिकाम्या असल्याचे सोशल मीडियाच्या माध्यमातून फोटो फिरत होते. विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे Ambadas Danve Said Rate Card यांनीही या फोटोवरून संदिपान भुमरे यांना चिमटा काढला होता.

Shiv Sena Vs Shinde Group
Shiv Sena Vs Shinde Group
author img

By

Published : Sep 11, 2022, 4:51 PM IST

मुंबई मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उद्या संभाजीनगर, पैठणला सभा आहे. Shiv Sena Vs Shinde Group मात्र काही दिवसापूर्वी एकनाथ शिंदे गटाचे आमदार आणि मंत्री संदिपान भुमरे यांच्या सभेला खुर्च्या रिकाम्या असल्याचे सोशल मीडियाच्या माध्यमातून फोटो फिरत होते. विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे Ambadas Danve Said Rate Card यांनीही या फोटोवरून संदिपान भुमरे यांना चिमटा काढला होता. Ambadas Danve Accusation त्यामुळे त्याच ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे Chief Minister Eknath Shinde यांनी सभा घेण्याचा निर्णय घेतला. मात्र आता या सभेला देखील लोक जायला तयार नाहीत. मंत्री संदीपान भुमरे गावोगावी जाऊन लोकांना सभेला येण्यासाठी विनंती करत आहेत. मात्र कोणीही जाण्यास तयार नाही. म्हणून आता शासकीय यंत्रणा सभेसाठी कामाला लावली आहे. आंगणवाडी, आशा सेविका यांना या सभेसाठी उपस्थित राहण्याबाबतचे पत्रच संभाजीनगर प्रशासनाकडून काढण्यात आलं असल्याचे विधान परिषद विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी म्हटलं आहे.

अंबादास दानवेंचा आरोप

अंबादास दानवेंचा आरोप तसेच संभाजीनगर येथे होणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या सभेला लोकांनी यावं, यासाठी रेट कार्ड प्रसिद्ध करण्यात आला आहे. या रेट कार्डनुसार सभेला येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला दीड हजार रुपये, प्रवास खर्च, नाष्टा- जेवण असे दिले जाणार असल्याचा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला आहे. सभेला गर्दी जमावी, यासाठी अशा प्रकारचे रेट कार्ड संभाजीनगर येथे प्रसिद्ध असल्याचे दानवे म्हणाले. तसेच शासकीय पत्रकाची बाब समोर आल्यानंतर एकनाथ शिंदे गटाकडून सर्वात केली जाते. हे पत्र खोटं असल्याचे सांगितले जाते. मात्र, संभाजीनगर प्रशासनाकडून अशा प्रकारचे पत्र काढून अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षक यांना सभेसाठी बोलवून गर्दी जमवण्याचा प्रयत्न केला जात असल्याची टीका अंबादास दानवे यांनी केली आहे.

सरन्यायाधीशांनी काही अलिखित नियम पाळले पाहिजेत राज्यात आलेलो एकनाथ शिंदे आणि भारतीय जनता पक्षाचे सरकार संविधानिक आहे किंवा नाही याबाबत कायदेशीर लढाई शिवसेना लढत आहे. सध्या हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असून सर्वोच्च न्यायालयाने याबाबत घटनापिठाची निर्मिती केली आहे. मात्र सर्वोच्च न्यायालयात नव्याने नियुक्त झालेले सरन्यायाधीश उदय लळीत यांच्या सत्काराचा कार्यक्रम मुंबई उच्च न्यायालयाकडून ठेवण्यात आला होता. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी हजेरी लावली. सर्वोच्च न्यायालयाचे नव्याने नियुक्त झालेले सरन्यायाधीश हे महाराष्ट्राचे पुत्र आहेत. त्याच्यामुळे त्यांचा सत्कार, अभिनंदन व्हायलाच हवं. मात्र ते होत असताना सरन्यायाधीशांनी राजकीय लोकांसोबत एकाच मंचावर जाणण्याचे टाळ पाहिजे. काही अलिखित नियम राखले गेले पाहिजेत, असा चिमटा ही दानवे यांनी काढला आहे.

ज्यांना गणेश विसर्जन करता येत नाही, त्यांनी हिंदुत्व शिकवू नये खासदार नवनीत राणा यांनी केलेल्या गणेश विसर्जनावर सध्या सगळीकडून टीका होत आहे. नवनीत राणा यांनी बाप्पाचे केलेल्या विसर्जनावर बोलताना अंबादास दानवे म्हणाले की, ज्यांना गणेश विसर्जन कसे करतात. हे देखील माहित नाही, त्यांनी आम्हाला हिंदुत्व शिकवू नये. तेजा मतदार संघाचे प्रतिनिधित्व करतायेत त्या मतदारसंघात नेहमीच हिंदू मुस्लिम असा वाद दाखवण्याचा प्रयत्न केला जातोय. मात्र असा वाद त्या मतदारसंघात नाही. केवळ खासदार नवनीत राणा तसा वाद दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत. ज्या मुलीच्या प्रकरणावरून पोलीस स्टेशनमध्ये जाऊन खासदार नवनीत राणा यांनी गोंधळ घातला. त्या प्रकरणातही संबंधित मुलीने आपण स्वतःहून घर सोडले असले तरी सांगितलं. समाजात फक्त तडे निर्माण करण्याचं काम खासदार नवनीत राणा करत असल्याची टीका अंबादास दानवे यांनी केली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.