ETV Bharat / city

Andheri East By Election : ऋतुजा लटके यांच्यासाठी मराठी मतांसोबतच काँग्रेसची मते निर्णायक ठरणार? - Along with Marathi votes

अंधेरी पूर्व, विधानसभा पोटनिवडणुकीसाठी ( Andheri East Assembly By Election ) महाविकास आघाडीच्या ऋतुजा लटके ( Rituja Latke ) भाजप - शिंदे युतीचे मुरजी पटेल ( Murji Patel of BJP Shinde alliance ) यांच्यात चुरशीची लढत होणार असून या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष आहे.

Andheri East By Election
Andheri East By Election
author img

By

Published : Oct 16, 2022, 5:34 PM IST

मुंबई - ३ नोव्हेंबरला होणाऱ्या अंधेरी पूर्व, विधानसभा पोटनिवडणुकीसाठी ( Andheri East Assembly By Election ) महाविकास आघाडीच्या ऋतुजा लटके ( Rituja Latke ) भाजप - शिंदे युतीचे मुरजी पटेल ( Murji Patel of BJP Shinde alliance ) यांच्यात चुरशीची लढत होणार असून या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले आहे. या मतदारसंघात असणाऱ्या मराठी मतांवर त्याच बरोबर मागच्या २०१९ च्या निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार जगदीश कुट्टी यांना भेटलेल्या २७ हजार ९५१ मतांवर ऋतुजा लटके यांचे भवितव्य अवलंबून असणार आहे.

काँग्रेसची मतं निर्णायक ठरणार? अंधेरी पूर्व, विधानसभा मतदारसंघात एकूण २ लाख ७३ हजार मतदार आहेत. गेल्या विधानसभा निवडणुकीत विजयी झालेल्या शिवसेनेच्या रमेश लटके यांना ६२ हजार ७७३ तर अपक्ष म्हणून उभे राहिलेल्या व दुसऱ्या क्रमांकावर आलेल्या मुरजी पटेल यांना ४५,८०८ मते भेटली होती. त्याचबरोबर तिसऱ्या जागेवर असलेल्या काँग्रेसच्या जगदीश कुट्टी यांना २७ हजार ९५१ मते भेटली होती. यंदा शिवसेनेचे ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) गटाचे रमेश लटके यांचे निधन झाल्याकारणाने त्यांच्या जागी त्यांच्या पत्नी ऋतुजा लटके या निवडणूक लढवत आहे. मागच्यावेळी अपक्ष राहिलेले मुरजी पटेल हे भाजपचे अधिकृत उमेदवार असून शिंदे, आठवले गटाने त्यांना समर्थन दिले असल्याकारणाने ते या निवडणुकीत उभे आहेत.

मुरजी पटेल यांना फटका बसण्याची शक्यता - तर, दुसरीकडे या निवडणुकीत आपला उमेदवार उभा न करता काँग्रेसने तसेच राष्ट्रवादीनेही ऋतुजा लटके यांना समर्थन दिलेलं आहे. त्यासाठी आता या निवडणुकीत दोन्ही काँग्रेसचे समर्थन ऋतुजा लटके यांना भेटल्या कारणाने मुरजी पटेल यांना याचा फटका बसण्याची शक्यता आहे. मुरजी पटेल अनेक वर्ष काँग्रेस नंतर अपक्ष असा प्रवास करून आलेले आहेत. काँग्रेसच्या मतदारांच्या सुद्धा ते संपर्कामध्ये असल्याकारणाने या निवडणुकीत काँग्रेसच्या मतदारांच्या कौल निर्णायक ठरणार हे नक्की.

ऋतुजा लटके यांना काँग्रेसचा पूर्ण पाठिंबा - या मतदारसंघात १ लाख ५ हजार मराठी, ५७ हजार उत्तर भारतीय, ३३ हजार मुस्लिम, १९ हजार ख्रिश्चन व इतर गुजराती धार्मिक मतदार आहेत. मुंबई महानगरपालिकेचे ८ प्रभाग या विभागांमध्ये असून त्यातील ५ ठिकाणी शिवसेनेचा, २ ठिकाणी भाजप व १ ठिकाणी काँग्रेसचे नगरसेवक आहेत. समिश्र असा हा विधानसभा मतदारसंघ असला तरी महत्त्वाचे म्हणजे काँग्रेसची २७ हजार ९५१ मतं जी मागच्या निवडणुकीत त्यांच्या उमेदवाराला भेटली होती ती आपल्याकडे खेचण्याचा त्याचबरोबर ती मते ऋतुजा लटके यांना मिळण्यासाठी या विभागात ३ टर्म आमदार असलेले व माजी आरोग्यमंत्री सुरेश शेट्टी हे सुद्धा मोठ्या प्रमाणात त्यासाठी प्रयत्न करणार आहेत.

काँग्रेसच्या मतदारांशी मुरजी पटेल यांचा व्यक्तिगत संपर्क - मी ३५ हजार च्या मताधिक्याने निवडून येईन, असं भाजपचे उमेदवार मुरजी पटेल यांनी स्वतःहून सांगितलं आहे. तर दुसरीकडे आमचा उमेदवार २५ हजार च्या मताधिक्याने निवडून येईल अस भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी सांगितलं आहे. मागच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेचे उमेदवार रमेश लटके यांचा १६,९६५ मतांनी विजय झाला होता. सध्याचे राजकीय गणित पाहता ही निवडणूक शिवसेनेसाठी कसोटीची जरी ठरणारी असली तरी, सुद्धा सहानुभूतीची लाट ही लटके यांच्या बाजूने आहे. दुसरीकडे दोन्ही काँग्रेसचा सुध्दा पूर्ण पाठिंबा हा ऋतुजा लटके यांना असल्याकारणाने यंदा हे मताधिक्य वाढण्याची शक्यता आहे. परंतु शेवट राजकारणात कधीही गाफील राहू नये असे म्हटले जाते. त्याप्रमाणे दुसरीकडे मुरजी पटेल हे काँग्रेसचे जिल्हा पदाधिकारी होते. २०१६ मध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. गेल्या निवडणुकीमध्ये ते अपक्ष जरी लढले असले तरीसुद्धा आजही ते काँग्रेसच्या मतदारांच्या संपर्कात आहेत. त्यामुळे काँग्रेसची मते व्यक्तिगत पातळीवर मुरजी पटेल यांना मिळण्याची ही शक्यता भाजपला वाटत आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.