मुंबई - मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग रचना करण्यात आली आहे. निवडणूक आयोगानेही या प्रभाग रचनेवर शिक्कामोर्तब केले आहे. जाणून बुजून प्रभाग रचना ( Municipal ward composition ) करण्यात आली आहे. यामुळे विरोधक अडचणीत येतील अशा प्रकारे प्रभाग रचना करण्यात आल्या आहेत. यावर कोणी कितीही प्रभाग रचना बदलली तरी आम्ही निवडून येऊ, असा दावा पालिकेतील विरोधी पक्षांकडून ( Mumbai Municipal Corporation Opposition ) करण्यात आला आहे. मुंबई महापालिकेची निवडणूक फेब्रुवारी 2017 मध्ये झाली होती. पाच वर्षांचा कार्यकाळ संपल्याने या निवडणुका यावर्षी फेब्रुवारी महिन्यात होणे अपेक्षित होते. कोरोनामुळे निवडणुका घेणे शक्य न झाल्याने राज्य सरकारने 8 मार्च पासून पालिकेवर प्रशासक नियुक्त केला आहे. मुंबईमधील लोकसंख्या वाढल्याने राज्य सरकारने 9 प्रभाग वाढवले आहेत. यामुळे सरकारने पालिकेतील प्रभागांची संख्या 227 वरून 236 केली आहे.
प्रभाग रचना : राज्य सरकारने जाहीर केल्याप्रमाणे 236 प्रभागांच्या पुनर्रचना करण्यात आली. त्यावर पालिकेने सूचना व हरकती मागवल्या. एकूण 812 सूचना व हरकती आल्या. त्यावर सुनावणी घेऊन त्याचा अहवाल पालिकेने निवडणूक आयोगाला सादर केला होता. निवडणूक आयोगाला सर्वोच्च न्यायालयाने निवडणुकांबाबत विचारणा केली असता प्रभाग रचनेबाबत अंतिम अधिसूचना जाहीर केली आहे. यामुळे प्रभागांच्या सीमा निश्चित झाल्या आहेत. यावर सात्ताधारी शिवसेना वगळता इतर विरोधी पक्षांनी उघड नाराजी व्यक्त केली आहे. याबाबत सत्ताधारी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क केला असता होऊ शकलेला नाही.
सोमैयांसह, भाजपा गटनेत्यांना फटका : भाजपाचे पालिकेतील गटनेते प्रभाकर शिंदे यांचा वॉर्ड रेल्वेच्या दोन्ही बाजूला विभागण्यात आला आहे. त्यांचा प्रभाग 5 किलोमीटर इतका करण्यात आला आहे. रेल्वेच्या पलीकडील 30 ते 40 टक्के भाग त्यांच्या विभागात समाविष्ट केला आहे. शिवसेनेला कोंडीत सोमैया यांचा मुलगा निल सोमैया ज्या प्रभागाचे प्रतिनिधित्व करतात त्या प्रभागातील 10 बूथ काढून प्रभाकर शिंदे यांच्या प्रभागात समाविष्ट करण्यात आले आहेत. यामुळे निल सोमैया यांच्या विभागात 47 हजार तर प्रभाकर शिंदे यांच्या प्रभागात 60 हजार मतदार झाले आहेत.
'मनातील सीमा बदलू शकत नाही' : प्रभाग रचनेवर आम्ही आमच्या सूचना व हरकती दाखल केल्या. निवडणूक आयोगाने आमच्या सूचना व हरकतींची दखल घेतली हा प्रश्न आमच्या मनात आहे. निवडणूक आयोगाने आता प्रभागांचे सीमांकान जाहीर केले आहे. मूळ मसुद्यात बदल करण्याचा प्रयत्न सत्ताधाऱ्यांनी केला होता. त्यांच्या सोयीनुसार प्रभाग रचना करण्याचा प्रयत्न केला. प्रभागांच्या सीमा तुम्ही बदलू शकता मात्र मुंबईकरांच्या मनातील सीमा आणि निर्णय तुम्ही बदलू शकत नाही. तो निश्चित आहे. भारतीय जनता पक्षाला यावेळी मुंबईकर संधी देणार आहेत, अशी प्रतिक्रिया पालिकेतील भाजपाचे प्रवक्ते भालचंद्र शिरसाट यांनी दिली आहे.
'जाणून बुजून प्रभाग रचना' : माझ्या प्रभागात काही फेरफार झाला आहे. काही भाग माझ्या विभागात जोडला आहे. तर मी ज्या प्रभागातून निवडून आलो आहे, त्यामधील काही भाग वगळण्यात आला आहे. कोणी काही करू द्या मी जिंकून येणार आहे. प्रभाग रचना जी केली आहे ती जाणून बुजून केली आहे, असे दिसून येत आहे, अशी प्रतिक्रिया पालिकेतील माजी विरोधीपक्ष नेते रवी राजा यांनी दिली आहे.
'या' विभागात वाढणार प्रभाग : परळ, वरळी, भायखळा, दहिसर, अंधेरी पूर्व, कांदिवली, कुर्ला, घाटकोपर, चेंबूर यआ विभागात प्रत्येकी एक प्रभाग वाढणार आहे.
हेही वाचा - Nagpur Orange Processing Issue : संत्र्याच्या 'कॅलिफोर्निया'त संत्र्यावर प्रक्रिया करणारे उद्योगच नाहीत!