ETV Bharat / city

Nawab Malik : नवाब मलिक यांना न्यायालयाचा दिलासा.. आता ईडीच्या कोठडीत मिळणार 'या' सुविधा

मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ईडीने बुधवारी अटक केल्यानंतर विशेष पीएमएल न्यायालयाने मंत्री नवाब मलिक यांना ईडी कोठडी सुनावली ( Nawab Malik In ED Custody ) आहे. मलिक यांनी केलेल्या विनंतीनुसार न्यायालयाने त्यांना सुविधा देऊ केल्या आहेत. यामध्ये घरचे जेवण, मेडिकल सुविधा तसेच तपासादरम्यान मलिक यांच्या वकिलाला उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली ( Nawab Malik Demands Granted By Court ) आहे.

नवाब मलिक
नवाब मलिक
author img

By

Published : Feb 24, 2022, 5:08 PM IST

मुंबई : महाराष्ट्राचे मंत्री, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व नवाब मलिक यांना ईडीने अटक केली ( Nawab Malik Arrested ) आहे. मलिक यांची ३ मार्चपर्यंत अंमलबजावणी संचालनालयाच्या कोठडीत रवानगी करण्यात आली ( Nawab Malik In ED Custody ) आहे. यादरम्यान मलिक यांनी केलेल्या तीनही मागण्या न्यायालयाने मान्य केल्या ( Nawab Malik Demands Granted By Court ) आहेत. त्यानुसार त्यांना ईडी कस्टडीत असताना घरचे जेवण, मेडिकल तसेच तपासादरम्यान वकिलांना उपस्थित राहता येणार आहे.

बुधवारी काय घडलं..?

राष्ट्रवादीचे नेते मंत्री नवाब मलिक यांना ईडीने बुधवारी अटक केली. 'लढेंगे जितेंगे, ईडी के आगे नही झूकेंगे, एक्सपोज करेंगे' अशी प्रतिक्रिया मलिक यांनी अटकेनंतर दिली. राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक ( Minister Nawab Malik ) यांची सकाळपासूनच ईडी कार्यालयात चौकशी सुरू होती. अखेर त्यांना ईडीने अटक केली ( Nawab Malik arrested by ED) आहे. पहाटे पाच वाजताच्या ईडीचे अधिकारी नवाब मलिक यांच्या कुर्ल्यातील राहत्या घरी पोहोचले. तिथे काही वेळ नवाब मलिक यांनी अधिकाऱ्यांनी चर्चा केल्यानंतर त्यांना 7.45 दरम्यान ईडी अधिकारी आपल्या कार्यालयात घेऊन आले. अखेर चौकशीनंतर नवाब मलिक यांना ईडीकडून अटक करण्यात आली. त्यांना न्यायालयात हजर केले असता ३ मार्चपर्यंत ईडी कोठडी सुनावण्यात आली.

देवेंद्र फडणवीस यांच्याकडून करण्यात आले होते आरोप-

1993 च्या बॉम्ब ब्लास्ट प्रकरणात गुन्हेगार असणारे सरदार शहावली खान आणि सलीम पटेल या दोघांकडून नवाब मलिक यांनी कुर्ल्यातील जमीन खरेदी केली होती. कुर्ल्यात मोक्याच्या परिसरामध्ये ही तीन एकर जागा असल्याचे फडणीसांनी सांगितले होते. 2005 मध्ये या ठिकाणी दोन हजार रुपये स्क्वेअर फुटच्यावर भाव असताना केवळ पंचवीस रुपये स्केअर फुट किमतीवर ही जमीन खरेदी कशी केली ? असा प्रश्न पत्रकार परिषदेतून देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला होता. मात्र या जमीन खरेदीत कोणताही गैरव्यवहार झाला नसून देवेंद्र फडणवीस सांगत असलेल्या तीन एकर जागा आपण खरेदी केली नाही. त्या जागेवरील काही भाग कायदेशीर रित्या खरेदी केला असल्याचे स्पष्टीकरण नवाब मलिक यांच्याकडून पत्रकार परिषदेत देण्यात आले होते.

देवेंद्र फडणवीस ड्रग्जच्या उद्योगांचे मास्टरमाईड

देवेंद्र फडणवीस हे राज्यातील ड्रग्जच्या उद्योगांचे मास्टरमाईड आहेत, असा धक्कादायक आरोप नवाब मलिक यांनी केला होता. देवेंद्र फडणवीस यांच्या ड्रग्ज प्रकरणातील सहभागाचा सीबीआय आणि इतर केंद्रीय तपास संस्थांच्या माध्यमातून तपास केला जावा, अशी मागणी नवाब मलिक यांनी केली होती. तसेच फडणवीस हे मुख्यमंत्री असताना त्यांनीच एनसीबीचे माजी अधिकारी समीर वानखेडेंची बदली केल्याचा आरोप मलिक यांनी केला होता. देशात हिटलरसारखी परिस्थिती निर्माण करुन सगळे नियम, घटना बदलून स्वतःकडे सर्व अधिकार घ्यायचे आहेत का, अशी शंका निर्माण होऊ लागली, असे नवाब मलिक म्हणाले होते. भाजपला लोकशाही संपवायची आहे. परंतु जनता त्यांना लोकशाही संपवू देणार नाही, असा इशारा मलिक यांनी दिला होता.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.