मुंबई - काँग्रेस आणि राष्ट्रवादीची संयुक्त पत्रकार परिषद नुकतीच मुंबईमध्ये पार पडली. यावेळी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते यांनी, भाजपमध्ये सगळे गँगवॉरचे लोक एकत्र येत आहेत, असे वक्तव्य केले. विविध टोळ्यांमधील लोक भाजपमध्ये एकत्र येत आहेत हे आम्ही याआधीही सांगितले होते. आज आमच्या बोलण्यावर शिवसेना-भाजप युतीने शिक्कामोर्तब केले आहे.
'भाजप गुंडांना तिकीट देते, त्यामुळे दाऊदच्या टोळीतील लोकदेखील खासदार झालेत..' भाजप गुंडांना तिकीट देत आहे..भारतीय जनता पक्षामध्ये गुंडांच्या टोळीमधले लोक होते. नरेंद्र मोदींच्या मंत्रीमंडळात दाऊदच्या टोळीतील माणूस होता. भाजपमध्ये येऊन दाऊदच्या टोळीतील लोक खासदार झाले आहेत. त्यामुळे भाजप हे गुंडांच्या मदतीने, पैशांच्या मदतीने आणि सरकारी ताकद वापरून राजकारण करताना दिसत आहे. तसेच, नरेंद्र मोदींनी जे गुजरातमध्ये केले तेच महाराष्ट्रात करण्याच्या हेतूने भाजप हे गुंडांना तिकीट देताना दिसत आहे, अशी टीका नवाब मलिक यांनी केली.आघाडीमधील जागावाटपांबाबत खुलासा करण्यासाठी ही पत्रकार परिषद घेण्यात आली होती. मात्र, काही लहान पक्षांशी अजूनही चर्चा सुरु असल्याने याबाबत खुलासा होऊ शकला नाही. याबद्दल दिलगिरी व्यक्त करत, हा खुलासा प्रेस नोटच्या माध्यमातून करण्यात येईल असे पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्ट केले.
यावेळी समाजवादी पार्टीचे नेते अबू आझमी देखील उपस्थित होते. मी केवळ शिवसेना आणि भाजपला रोखण्यासाठी आघाडीमध्ये सामील झालो आहे. भाजप-शिवसेना देशाला धर्माच्या नावावर विभागत आहेत, आणि देशाची आर्थिक स्थितीदेखील धोक्यात आणत आहेत. त्यामुळे काहीही करून आघाडीमध्ये सामील होण्याचा माझा प्रयत्न होता, असे स्पष्टीकरण त्यांनी यावेळी दिले.
हेही वाचा : वरळीमध्ये आघाडीचा उमेदवार असणारच, नवाब मलिक यांचे स्पष्टीकरण