ETV Bharat / city

Withdraw All Lockdown Violation Cases : ठाकरे सरकारचा मोठा निर्णय; कोरोना काळातील 'हे' गुन्हे घेणार मागे

कोरोना काळात नागरिक आणि विद्यार्थांवर कलम 188 अंतर्गत दाखल झालेले सर्व गुन्हे मागे घेणार अशी माहिती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील ( Home Minister ) यांनी दिली आहे.

Home Minister
वळसे पाटील
author img

By

Published : Mar 29, 2022, 1:08 PM IST

Updated : Mar 29, 2022, 3:06 PM IST

मुंबई - ठाकरे सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. त्यामुळे लॉकडाऊनच्या काळात गुन्हे दाखल झालेल्या काही नागरिकांना मोठ्या दिलासा मिळणार आहे. लॉकडाऊनच्या काळात विद्यार्थी, नागरिकांवर लॉकडाऊन आदेशाचे उल्लंघन केल्याबद्दल IPC 188 अंतर्गत दाखल झालेले सर्व खटले राज्य गृह विभागाने मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. मंत्रिमंडळाच्या निर्णयाला मंजुरी मिळाल्यानंतर खटले मागे घेण्याची प्रक्रिया सुरू होईल अशी माहिती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली आहे.

गृहमंत्री वळसे पाटील यांची प्रतिक्रिया

१८८ अंतर्गत दाखल झालेले सर्व गुन्हे मागे घेणार - “कोविडच्या काळात ज्या नागरिक किंवा विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल झाले आहेत. सध्या त्यांना विविध अडचणी येत आहेत. त्यांना पासपोर्ट मिळवताना, परदेशात जाण्यासाठी किंवा इतर कारणांसाठी अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे आम्ही तत्वत: १८८ अंतर्गत दाखल झालेले सर्व गुन्हे मागे घेणार आहोत. मंत्रिमंडळात या विषयावर निर्णय घेण्यात येईल” असे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सांगितले आहे.

  • State Home Dept has decided to withdraw all cases filed under IPC 188 during lockdown against students, citizens for violation of lockdown order. Once the decision is approved by the Cabinet, the process of withdrawal of cases will start: Maharashtra Home Minister Dilip W Patil pic.twitter.com/tCHCgeyEqv

    — ANI (@ANI) March 29, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

नागरिकांसह विद्यार्थ्यांना मोठा दिलासा - बैलगाडा शर्यतीला बंदी नियमांचे उल्लंघन करणाऱ्या बैलगाडा मालकांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेण्याचा निर्णय वळसे -पाटील यांनी सोमवारी जाहीर केला होता. आज कोविड काळात विद्यार्थी, नागरिकांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेण्याची घोषणा केली. त्यामुळे नागरिकांसह विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

हेही वाचा - UPSC टाॅपर टीना डाबी घेणार मराठमोळ्या प्रदीप गावंडेंसोबत 7 फेरे, जाणून घ्या कोण आहेत प्रदीप

Last Updated : Mar 29, 2022, 3:06 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.