मुंबई - राज्यात व्याघ्र संरक्षणासाठी महावितरण, पोलीस, महसूल तसेच वन विभाग यांच्यासह संबंधित विभागांनी एकत्र येऊन समन्वयाने काम करावे. तसेच, जिल्हास्तरावर पोलीस अधिक्षक यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन केलेल्या व्याघ्र कक्षाच्या बैठका नियमित स्वरूपात घ्याव्या, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ( Uddhav Thackeray On Tiger Conservation ) दिले. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली वन विभागाची दूरदृष्यप्रणालीद्वारे बैठक ( Cm Thackeray Forest Department Meeting ) आयोजित केली होती. त्यावेळी ते बोलत होते.
याबैठकीस पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे ( Minister Aditya Thackeray ), मुख्यसचिव देबाशिष चक्रवर्ती, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, पोलीस महासंचालक संजय पांडे, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वनबल प्रमुख) जीतसिंह, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) सुनील लिमये उपस्थित होते.
तर कडक शिक्षा करा...
राज्यातील वाघांची संख्या ( Maharashtra tiger Number ) आणि जागेचे प्रमाण व्यस्त आहे. त्यामुळे तात्पुरत्या उपाययोजना न करता कोणत्या कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात. वाघांची शिकार होणार नाही यादृष्टीने जनजागृती करतांना कायद्याची कडक अंमलबजावणी करा. कडक शिक्षेची तरतूद करण्यासाठी आवश्यकतेनुसार कायद्यात बदलही करा. जंगलात विकास कामे करताना विशेषत: रेल्वे लाईनचे नियोजन करताना राज्याच्या वन विभागाशी चर्चा करुन त्याचे नियोजन केल्यास वन्यजीवांना होणारा धोका टाळता येईल, अशा सूचनाही मुख्यमंत्री ठाकरे यांनी अधिकाऱ्यांनी ( Cm Thackeray Instruction Officer ) दिल्या.
व्यवस्थापन आराखडा तयार करा
या बैठकीत बोलताना पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे ( Minister Aditya Thackeray ) यांनी सांगितले की, राज्य शासनाने नव्याने जाहीर केलेल्या संवर्धन राखीव क्षेत्रांचा व्यवस्थापन आराखडा लवकरात लवकर तयार करावा. संरक्षित वन क्षेत्रातले ग्रीन कव्हर वाढले का हे ही पाहिले जावे. जिथे पुर्नवनीकरण करणे आवश्यक आहे तिथे वृक्षलागवड करावी. महामार्गालगतही वृक्षलागवडीचा विचार करण्याचे, मत यावेळी आदित्य ठाकरे मांडले.
उपाययोजना करण्यासाठी अभ्यासगट
राज्यात एकूण ७१ संरक्षित क्षेत्रे अधिसुचित करण्यात आली आहेत. यात सहा व्याघ्र प्रकल्प आहेत. राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण व भारतीय वन्यजीव संस्था देहरादून यांनी केलेल्या गणनेत राज्यात ३१२ इतकी वाघांची संख्या असल्याचे दिसते. चंद्रपूर जिल्ह्यात २०० वाघ आढळून येत असल्याने तिथे मानव वन्यजीव संघर्षाच्या घटना वारंवार घडतात. त्यामुळे उपाययोजना करण्यासाठी विशेष अभ्यासगटाने दिलेल्या शिफारसी राज्य वन्यजीव मंडळाच्या बैठकीत मान्य करण्यात आल्या आहे. त्यावर कार्यवाही सुरु असल्याची माहिती ही बैठकीत देण्यात आली.
हेही वाचा -Mumbai Schools Closed : मुंबईतील पहिली ते आठवीच्या शाळा 31 जानेवारीपर्यंत बंद