मुंबई - दिल्लीतून मुंबईत आलेल्या एका व्यक्तीने फेसबुक या समाज माध्यमावर काही व्हिडीओ शेअर केले. यावरून ही व्यक्ती आत्महत्या करण्याच्या तयारीत असल्याचे फेसबुकच्या आयरलँडमधील कार्यालयालाच्या लक्षात आले. यामुळे फेसबुक कार्यालयातून तत्काळ ही माहिती दिल्ली पोलीस आणि मुंबई पोलिसांना देण्यात आली. यामुळे काही वेळातच मुंबई पोलिसांनी या व्यक्तीचा शोध घेऊन सदर व्यक्तीस आत्महत्या करण्यापासून रोखले.
8 ऑगस्टला फेसबुकवर एका व्यक्तीने आत्महत्या करण्यासंदर्भांत काही व्हिडीओ शेअर केले होते. यावेळी आयरलँडमधील फेसबुक कार्यालयात व्हिडीओ मॉनिटर करणाऱ्या ऑपरेटरला याबाबत शंका निर्माण झाली. यानंतर तत्काळ दिल्ली सायबर पोलिसांना या माहितीसह संबंधित व्यक्तीचा आयपी अॅड्रेस आणि रजिस्टर्ड मोबाईल नंबर देण्यात आला. दिल्ली सायबर पोलिसांना यासंदर्भात अधिक तपास केला असता, दिल्लीतील एका महिलेच्या पत्त्यावर पोलीस पोहचले. मात्र, त्यावेळी या महिलेने हा मोबाईल क्रमांक तिच्या नावावर असला तरी तिचा पती हा नंबर आणि फेसबुक खाते वापरत असल्याची माहिती पोलिसांना दिली. दरम्यान, या महिलेचा पती मुंबईत असून त्याचा मुंबईतील पत्ता महिलेला माहित नव्हता.
हेही वाचा - ईटीव्ही भारत विशेष: का होते मुंबापुरीची ...तुंबापुरी?
यानंतर दिल्ली पोलिसांनी ही माहिती मुंबई पोलिसांच्या सायबर विभागाच्या पोलीस उपायुक्त रश्मी करंदीकर यांना दिली. यानंतर मुंबई पोलिसांच्या माध्यमातून या व्यक्तीचा शोध घेण्यास सुरवात झाली. सुरुवातीला पोलिसांनी या व्यक्तीच्या पत्नीला त्याच्याशी बोलण्यास सांगितले आणि मुंबई सायबर पोलीस खात्यातली एक अधिकारी या दोघांच्या कॉलवरील संभाषण कॉन्फरन्सच्या माध्यमातून ऐकत होता.
![anil deshmukh tweet](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/8377491_650_8377491_1597141045972.png)
![anil deshmukh tweet](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/8377491_325_8377491_1597141071586.png)
या संभाषणादरम्यान सदर व्यक्तीचे मोबाईल लोकेशन हे भायंदर येथे आढळून आले. यामुळे स्थानिक पोलिसांना त्या ठिकाणी जावून त्या व्यक्तिला आत्महत्या करण्यापासून रोखण्यात यश आले आहे. या घटनेची नोंद गृहमंत्री अनिल देशमुखांनी घेतली असून ट्विटरच्या माध्यमातून मुंबई पोलिसांचे कौतुक केले आहे.
हेही वाचा - पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू म्हणतो, ''रामाने बोलावले तर अयोध्येत येईन''