ETV Bharat / city

Anil Deshmukh Case : अकोल्याचे पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांची ईडीकडून चौकशी

author img

By

Published : Dec 17, 2021, 7:55 PM IST

कथित 100 कोटी वसुली प्रकरणी ( Anil Deshmukh Case ) सध्या माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh In ED Custody ) जेलमध्ये आहेत. आता या प्रकरणात अकोल्याचे पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांची सक्तवसुली संचलनालयाने ( ED Summons To Akola SP G Shridhar) चौकशी केली आहे.

SP G Sridhar interrogated by ED
SP G Sridhar interrogated by ED

मुंबई - कथित 100 कोटी वसुली प्रकरणी ( Anil Deshmukh Money Laundering Case ) सध्या माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh In ED Custody ) जेलमध्ये आहेत. आता या प्रकरणात अकोल्याचे पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांना सक्तवसुली ( ED Summons To Akola SP G Shridhar) संचलनालयाने समन्स जारी केला आहे. यानुसार ते आज (दि.17) रोजी ईडी कार्यालयात ( G Shridhar ED Enquiry ) चौकशीसाठी हजर झाले होते. ईडीकडून त्यांची 4 तास चौकशी करण्यात आली आहे.

प्रकरणात जी. श्रीधर यांचा सहभाग?

अनिल देशमुख यांची कथित खंडणी प्रकरणात चांदिवाल आयोगासमोर ( Candiwal Commission For Anil Deshmukh Money Laundering Case ) चौकशी सुरू आहे. या संपूर्ण चौकशीत अकोल्याचे पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांचे नाव समोर आल्याची प्राथमिक माहिती आहे. त्यामुळे 'ईडी'च्या चौकशीनंतर या प्रकणारत श्रीधर यांचा असलेला सहभाग स्पष्ट होण्याची शक्यता आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह ( Parambir Singh Alligation ) यांनी 100 कोटींच्या खंडणीचे आरोप केल्यानंतर आणि वाझेशी असणारे (Anil Deshmukh And Sachin Vaze Relation ) संबंध उघडकीस आल्यानंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांना राजीनामा (Anil Deshmukh Resign) द्यावा लागला होता. यानंतर त्यांच्यावर कारवाईचा बडगा सुरूच आहे. दरम्यान, देशमुख यांच्याशी निगडीत विविध मालमत्तांवर ईडीने याआधीच छापे देखील ( ED Raid On Anil Deshmukh Property ) टाकले आहेत. प्रकरण इथेच नाही थांबलं, तर या कथित घोटाळ्यासंदर्भात चांदिवाल आयोगाची स्थापना राज्य सरकारने केली. त्यानुसार वाझे ( Chandiwal Commission Sachin Vaze ) आणि देशमुख यांची चौकशी सुरू आहे.

काय आहे प्रकरण -

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून गंभीर आरोप केले होते. त्या पत्रानुसार, निलंबित सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे हे क्राईम इंटेलिजन्सचे यूनिट हेड करत होते. गेल्या काही महिन्यांत गृहमंत्री अनिल देशमुखांनी कित्येक वेळेस वाझेंना त्यांच्या ज्ञानेश्वर या निवासस्थानी बोलवले आणि दर महिन्याला 100 कोटी रुपये जमा करायला सांगितले. देशमुख वाझेंना म्हणाले की, मुंबईत 1 हजार 750 बार आणि रेस्टॉरेंट आहेत आणि त्यातल्या प्रत्येकाकडून 2 ते 3 लाख रुपये कलेक्ट केले तरीसुद्धा महिन्याला 40 ते 50 कोटी रुपये सहज उपलब्ध होतील. राहिलेली इतर रक्कम इतर मार्गांनी जमा करता येईल. देशमुख हे पोलीस अधिकाऱ्यांना त्यांच्या निवसस्थानी बोलवायचे. पोलिसांना ते सातत्याने सूचना द्यायचे. मला किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांना अंधारात ठेवून देशमुख हे पोलीस अधिकाऱ्यांना त्यांच्या बंगल्यावर बोलवायचे आणि पैसे गोळा करण्यासाठी टार्गेट द्यायचे, आदी आरोप मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी देशमुखांवर केले होते. त्यानंतर या प्रकणात परमबीर सिगं यांचेही नाव आले होते.

हेही वाचा - Department Funds Allocation : मुख्यमंत्री शिवसेनचा, मात्र सर्वाधिक निधी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खात्यांना

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.