ETV Bharat / city

'या'मुळे होत नाही कोरोना - डॉ. अजित रानडे

author img

By

Published : Mar 7, 2020, 5:29 PM IST

Updated : Mar 7, 2020, 5:58 PM IST

जगभरात कोरोना विषाणूने थैमान घातलो आहे. काही अफवांमुळे लोकांनी भीतीपोटी चिकन, मटन आणि अंडी खाणे बंद केले आहे. याबद्दल मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालयाचे डीन डॉ. अजित रानडे यांनी माहिती दिली आहे.

ajit-ranade-said-eating-meat-eggs-does-not-cause-the-corona-virus
यामुळे होत नाही कोरोना - डॉ. अजित रानडे

मुंबई - जगभरात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. कोरोनाबाबत सोशल मीडियावर पसरवण्यात येणाऱ्या अफवांमुळे भीतीचे वातावरण पसरले आहे. या भीतीपोटी लोकांनी चिकन, मटण आणि अंडी खाणे बंद केले आहे. चिकन, मटण आणि अंडी खाल्याने कोणत्याही प्रकारे कोरोना विषाणूची लागण होत नाही. भारताच्या कृषी मंत्र्यांनीही मांस आणि अंडी खाल्याने कोरोना विषाणूचा धोका नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे अफवांवर विश्वास न ठेवता बिनधास्त चिकन, मटण आणि अंडी खावीत असे, आवाहन मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे डीन डॉ. अजित रानडे यांनी केले आहे. या अफवांमुळे महाराष्ट्र्रातील मांस आणि अंडी विक्री करणाऱ्या व्यवसायिकांचे ५०० कोटींचे नुकसान झाल्याचेही त्यांनी सांगितले. मुंबई मराठी पत्रकार संघात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी हे आवाहन केले आहे.

यामुळे होत नाही कोरोना - डॉ. अजित रानडे

चीनच्या हुवांग प्रांतात सुरुवातीला निदर्शनास आलेला कोरोना विषाणू जगभरात पसरला आहे. या विषाणूने हजारो लोकांचा मृत्यू झाला आहे. भारतातही या विषाणूचे ३१ रुग्ण आढळले आहेत. कोरोना विषाणू जगभरात पसरत असताना सोशल मीडियावरून मांस आणि अंडी खाऊ नका, मांस आणि अंडी वैगेरे खाल्याने विषाणू पसरतो अशा अफवा पसरवण्यात आल्या आहेत. याचा परिणाम म्हणून लोकांनी कोंबड्या आणि अंडी खाणे बंद केले आहे. यामुळे त्याचा परिणाम शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर झाला आहे. अनेक ठिकाणी कोंबडी आणि अंड्यांचा दर कमी झाला असल्याने कुक्कुटपालन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या आणि मांस, अंडी विक्री करणाऱ्या व्यावसायिकांच्या व्यवसायावर परिणाम झाला आहे.

हेही वाचा - नागपुरात कोरोनाच्या धसक्याने एन ९५ मास्कच्या किमती वाढल्या

या पार्श्वभूमीवर डॉ. अजित रानडे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलताना कोरोना विषाणू आणि मांस, अंडी यांचा काहीही संदर्भ नाही. सोशल मीडियावर गैरसमज आणि पसरवल्या जाणाऱ्या अफवांमुळे लोकांना अंडी आणि मांस खायचे कि नाही, असा प्रश्न पडला आहे. लोकांनी मांस आणि अंडी खाणे कमी केले आहे. याचा परिणाम म्हणून कोंबडी आणि अंडी यांचे दर घसरले आहेत, असे रानडे यांनी सांगितले. जगामध्ये कुठेही अंडी आणि मांस खाल्ल्याने हा विषाणू पसरतो असे समोर आलेले नाही. तरीही अफवांचे पेव फुटल्याने अंडी आणि चिकन खाणे कमी झाले आहे. त्याचा परिणाम शेतकऱ्यांचे उत्पन्न आणि या व्यवसायावर झाला आहे. गेल्या महिनाभरात अंडी आणि कोंबड्यांची कमी प्रमाणात विक्री झाल्याने सुमारे ५०० कोटींचे नुकसान झाले असल्याचे रानडे यांनी सांगितले. कोरोना विषाणू मांस आणि अंडी खाल्ल्याने पसरत नाही. त्यामुळे लोकांनी अफवांवर विश्वास न ठेवता बिनधास्त चिकन, मटण, अंडी खावीत असे आवाहन डॉ. अजित रानडे यांनी केले आहे.

अंडी आणि मांसातून प्रथिने मिळतात -

अंडी आणि मांस यांच्यामध्ये चांगली प्रथिने आहेत. ही प्रथिने सध्या महिनाभर लोकांकडून खाल्ली जात नाहीत, त्यामुळे त्याचा लोकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होणार आहे. भारतात अन्न चांगल्या १०० डिग्रीहून अधिक तापमानावर शिजवले जाते. अन्न शिजवताना मसाले वापरले जातात. त्यामुळे कोरोना विषाणू अन्नामधून पसरला जाऊ शकत नाही. यामुळे लोकांनी अफवांवर विश्वास न ठेवता बिनधास्त चिकन, मटण, अंडी खावीत, असे आवाहन डॉ. अजित रानडे यांनी केले आहे. मांस आणि अंडी खाल्याने प्रथिने मिळत असल्याने रोगप्रतिकार शक्ती वाढते असेही रानडे यांनी सांगितले.

हेही वाचा - इलेक्ट्रॉनिक बाजारपेठेलाही 'कोरोना'चा फटका, किंमतीत 15 टक्क्यांनी वाढ

Last Updated : Mar 7, 2020, 5:58 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.