मुंबई- राज्यात महाविकास आघाडीची सत्ता जाऊन एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांची सत्ता आली आहे. त्यामुळे माजी मंत्र्यांना त्यांचे बंगले बदलावी लागणार आहेत. असे असले तरी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार हे बंगला बदलण्यास तयार नसल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
राष्ट्रवादीने हे फेटाळले आहे. पण, देवेंद्र फडणवीस यांना मंत्र्यांचा राखीव असलेला सागर बंगला देण्यात आला होता. त्यामुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अजित पवारांनी विनंती केल्यास त्यांना देवगिरी बंगल्यात राहण्याची परवानगी देणार का हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
अलका चौकात समोरासमोरच बॅनर -राज्यात सत्ता बदल झाल्यानंतर पुण्यात मात्र माझी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकर्त्यांमध्ये चांगली चढाओढ दिसत आहे. 22 जुलै रोजी या दोन्ही नेत्यांचा वाढदिवस आहे, ( Ajit Pawar VS Devendra Fadnavis ) आणि या वाढदिवसाचे बॅनर आता शहरभर लागले आहेत. ( Pune Minister Banner ) मात्र अलका चौकात समोरासमोरच बॅनर लावण्यात आलेले आहे.
पुण्यातील अलका टॉकीज चौकात बॅनरबाजी - एका बॅनरमध्ये अजित पवार एकच पालक अजित पवार असे लिहिलेला आहे. देवेंद्र फडवणीस यांच्या बॅनरवर निष्कलंक नेतृत्व निर्विवाद कर्तुत्व असा मजकूर आहे. हे दोन्ही बॅनर पुण्यातील अलका टॉकीज चौकामध्ये समोरासमोर लावण्यात आलेले आहे. ( Ajit Pawar VS Devendra Fadnavis ) त्यामुळे पुण्यामध्ये या दोन्ही बॅनरची सध्या मोठी चर्चा चालू आहे.
हेही वाचा-हेही वाचा-Ajit Pawar VS Devendra Fadnavis : अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांचा एकाच दिवशी वाढदिवस, पुण्यात कार्यकर्त्यांची शुभेच्छांसाठी बॅनर बाजी !