ETV Bharat / city

Monsoon Session 2022 विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या प्रश्नापुढे आरोग्य मंत्री गडबडले, प्रश्न राखून ठेवण्याची सरकारवर नामुष्की - आरोग्यमंत्री तानाजी सावंत अधिवेशन

विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी, पालघर जिल्ह्यात हत्तीरोगाचा प्रादुर्भाव Palghar Health issue रोखण्यासाठी कार्यरत यंत्रणेसाठी मंजूर अधिकारी, कर्मचाऱ्यांची पदे, भरण्यात आलेली पदे, रिक्त पदांची संख्या, हत्तीरोग प्रतिबंधक उपाययोजनांसाठी मंजूर निधी, मागील वर्षात खर्च झालेला निधी या प्रश्नांची सरबत्ती आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्यावर केली होती. ही माहिती आरोग्यमंत्र्यांकडे नसल्याने त्यांना उत्तर देता आले नाही.

अजित पवार
अजित पवार
author img

By

Published : Aug 18, 2022, 12:50 PM IST

मुंबई विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पालघर जिल्ह्यातील हत्तीरोग प्रतिबंधक Ajit Pawar in monsoon session उपाययोजनांसंदर्भात केलल्या प्रश्नांच्या सरबत्तीची उत्तरे देताना आरोग्यमंत्री तानाजी सावंत चागलेच Health Minister Tanaji Sawant गडबडले. शिंदे सरकारच्या कारकिर्दीतील पहिलाच प्रश्न उत्तरासाठी राखून ठेवण्याची नामुष्की शिंदे सरकारवर आली. आता या प्रश्नाचे उत्तर सरकारकडून सोमवारी दिले जाणार आहे.

विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी, पालघर जिल्ह्यात हत्तीरोगाचा प्रादुर्भाव Palghar Health issue रोखण्यासाठी कार्यरत यंत्रणेसाठी मंजूर अधिकारी, कर्मचाऱ्यांची पदे, भरण्यात आलेली पदे, रिक्त पदांची संख्या, हत्तीरोग प्रतिबंधक उपाययोजनांसाठी मंजूर निधी, मागील वर्षात खर्च झालेला निधी या प्रश्नांची सरबत्ती आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्यावर केली होती. ही माहिती आरोग्यमंत्र्यांकडे नसल्याने त्यांना उत्तर देता आले नाही. प्रश्न उत्तरासाठी सोमवारपर्यंत राखून ठेवण्यात आला.

जिल्ह्यातील ८० बालकांना रोगाची लागण पालघर जिल्ह्यातील हत्तीरोगाच्या प्रादुर्भावाचा प्रश्न गंभीर असून ऑक्टोबर २०२१ मध्ये झालेल्या सर्वेक्षणात जिल्ह्यातल्या ८० बालकांना रोगाची लागण झाल्याचे आढळून आले आहे. डहाणू, विक्रमगड, तलासरी तालुक्यातील २९ बालकांना या रोगाची लागण झाली आहे. यासंदर्भात प्रश्न विचारताना विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी डासांमुळे पसरणारा हत्तीरोग गंभीर आहे. त्यामुळे शरीर विद्रुप व अकार्यक्षम होते. लागण झाल्यावर या आजारावर परिणामकारक उपचार नाहीत. त्यामुळे प्रतिबंधात्मक उपाययोजना महत्वाच्या आहेत. याकडे लक्ष वेधले.

प्रश्न सोमवारपर्यंत राखून विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी जिल्ह्यातील प्रतिबंधात्मक उपाययोजना कार्यक्षम होण्यासंदर्भात प्रश्न विचारला होता. हत्तीरोग नियंत्रण यंत्रणेसाठी मंजूर अधिकारी, कर्मचाऱ्यांची पदे, त्यापैकी भरण्यात आलेली पदे, रिक्त पदांची संख्या, हत्तीरोग प्रतिंबंक उपाययोजनांसाठी पालघर जिल्ह्यासाठी मंजूर निधी व वर्षभरात खर्च झालेला निधी या प्रश्नांची उत्तरे आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांना देता आली नाहीत. त्यामुळे हा प्रश्न उत्तरासाठी सोमवापर्यंत पुढे ढकलण्यात आला.

पालघरमध्ये पायाभूत आरोग्य सुविधा व रस्ते नसल्याने गर्भवती महिलेच्या दोन जुळ्या मुलांचा मृत्यू झाला होता. यावरही विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी प्रश्न उपस्थित केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत सरकार गंभीर असल्याचे उत्तर दिले Eknath shinde answer to Ajit Pawar आहे.

हेही वाचाKedarnath Yatra केदारनाथ यात्रेने मोडले आत्तापर्यंतचे सर्व विक्रम, भाविकांची मांदियाळी

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.