मुंबई गणेश उत्सव काळामध्ये शिवसेना आणि शिंदे गटात (Controversy between ShivSena Shinde group) अनेक ठिकाणी संघर्ष झाल्याचं पाहायला मिळालं. सत्ताधारी पक्षातले आमदारच थेट बंदूक बाहेर काढत असतील. गोळीबार (sada sarvankar firing case) करत असतील. तर महाराष्ट्रात उत्तर प्रदेश आणि बिहारसारखी परिस्थिती निर्माण केली जातेय का? असा सवाल राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार (ajit pawar) यांनी पत्रकार परिषदेत उपस्थित केला.
राज्यात बिहार आणि उत्तरप्रदेशसारखी स्थिती सत्ताधारी पक्षातले आमदार जर असे वागायला लागले तर राज्यातील कायदा सुव्यवस्थेबाबतीत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी काय केलं पाहिजे. त्यामुळे हे सर्व प्रकरण गंभीर आहे. हे सर्व प्रकरण येत्या अधिवेशनात आपण विधानसभेत मांडणार असल्याचं अजित पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले. तसेच राज्यासमोर अनेक अडचणी उभ्या आहेत. त्यामुळे राज्याची राजकीय परिस्थिती अशीच चिघळत ठेवणे योग्य नाही असा सल्लाही अजित पवार यांनी दिला आहे.
महाराष्ट्रासमोर मोठ्या समस्या राज्यात अनेक ठिकाणी ढगफुटी अतिवृष्टी (Thunderstorms in state) झालेली आहे. लंपी रोगाचा प्रभाव (Effect of lumpy disease) महाराष्ट्रातही जाणवतोय. त्यामुळे राज्यातील शेतकरी आणि कष्टकरी हा अडचणीत सापडला असताना मुख्यमंत्री मात्र गणेशोत्सवात सर्वांच्या घरी जाऊन गणपतीचे दर्शन घेण्यामध्ये व्यस्त आहेत असा चिमटा राज्याचे विधानसभा विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी मुख्यमंत्र्यांना काढला आहे. आम्ही काही नास्तिक नाही. गणेश उत्सवाच्या काळात आम्हीही बापाच्या दर्शनासाठी अनेक ठिकाणी गेलो मात्र महत्त्वाच्या पदावर असलेल्या व्यक्तीने दर्शनासाठी किती वेळ द्यावा याचं भान त्यांनी ठेवायला हवं असा टोला अजित पवार यांनी विधान भवनात पत्रकारांशी संवाद साधताना मुख्यमंत्र्यांना लगावला.