ETV Bharat / city

Ajit Pawar विधानभवन परिसरात आत्मदहनाचा प्रयत्न करणाऱ्या शेतकऱ्याची अजित पवारांकडून विचारपूस, म्हणाले असं काही

author img

By

Published : Aug 24, 2022, 4:13 PM IST

विरोधी पक्ष नेते अजित पवार Leader of the Opposition Ajit Pawar यांनी आज मुंबई येथे आत्मदहनाचा प्रयत्न करणाऱ्या शेतकऱ्याची भेट Ajit Pawar met farmer who Tried self immolated घेतली. कोणत्याही परिस्थितीत खचून जाऊ नका, टोकाचे पाऊल उचलू नका, असा धीर देत, न्याय मिळवून देण्यासाठी विरोधी पक्ष सर्वतोपरी मदत करणार असल्याचे, आश्वासन पवार यांनी देशमुख यांच्या कुटुंबियांना दिले.

Ajit Pawar
अजित पवार

मुंबई विरोधी पक्ष नेते अजित पवार Leader of the Opposition Ajit Pawar यांनी आज मुंबई येथे आत्मदहनाचा प्रयत्न करणाऱ्या शेतकऱ्याची भेट Ajit Pawar met farmer who Tried self immolated घेतली. कोणत्याही परिस्थितीत खचून जाऊ नका, टोकाचे पाऊल उचलू नका, असा धीर देत, न्याय मिळवून देण्यासाठी विरोधी पक्ष सर्वतोपरी मदत करणार असल्याचे, आश्वासन पवार यांनी देशमुख यांच्या कुटुंबियांना दिले.

शेतकऱ्याने का केला होता आत्मदाण्याचा प्रयत्न शेतीच्या प्रश्नामुळे त्रस्त असणाऱ्या उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकरी सुभाष देशमुख यांनी, मंगळवारी विधानभवनाच्या प्रवेशव्दारासमोर आत्मदहनाचा प्रयत्न केला होता. यामध्ये सुभाष देशमुख काही प्रमाणात भाजले आहेत. त्यांना उपचारार्थ मुंबई येथील जे. जे. हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. आज सकाळी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सुभाष देशमुख यांची भेट घेऊन त्यांच्या तब्बेतीची चौकशी केली. त्यांची अडचण जाणून घेत कोणत्याही परिस्थितीत खचून जाऊ नका, कोणतेही टोकाचे पाऊल उचलू नका, अशी विनंती केली. त्यांच्या शेतीचा प्रश्न सोडविण्यासाठी विरोधी पक्षाच्यातवीने सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन, त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना अजित पवार यांनी दिले.

विधानभवन परिसरात आत्मदहन करणाऱ्या शेतकऱ्याची अजित पवारांकडून विचारपूस

पावसाळी अधिवेशन सुरू असतानाच विधानभवनाच्या मुख्य प्रवेशद्वारावर आत्महत्येचा प्रयत्न करणारे साताऱ्या जिल्ह्यातील काळवणे चे रहिवासी, शेतकरी सुभाष देशमुख यांच्या तब्येतीची विचारपूस, विधानसभा विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी जेजे रुग्णालयात जाऊन केली. काल 23 ऑगस्ट रोजी विधान भवनाच्या मुख्य प्रवेशद्वारावर सुभाष देशमुख यांनी अंगावर रॉकेल ओतून स्वतःला पेटवून घेण्याचा प्रयत्न केला होता. मात्र सुरक्षारक्षकांनी शेतकरी सुभाष देशमुख यांना वाचवले. मात्र या अपघातात जवळपास 35 ते 40 टक्के सुभाष देशमुख भाजले गेले. त्यानंतर त्यांना जे जे रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. आज सकाळीच अजित पवार यांनी जेजे रुग्णालयात जाऊन, सुभाष देशमुख यांच्या तब्येतीची विचारपूस केली आहे.

सध्या राज्यभरात अतिवृष्टीचा फटका बसला आहे. यामुळे शेतकरी अडचणीत सापडला असून, राज्यामध्ये ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी विरोधी पक्षाकडून करण्यात आली आहे. मात्र राज्यामध्ये झालेल्या अतिवृष्टी बाबत, मुख्यमंत्र्यांनी विधानसभेमध्ये दिलेल्या उत्तरावरून विरोधी पक्ष समाधानी नसल्याचे,अजित पवार यांनी कालच स्पष्ट केले. अतिवृष्टीचा फटका जवळपास 17 हजार हेक्टर मध्ये बसला आहे. मात्र सरकारने केलेली मदत तुटपुंजी असल्याचा आरोप, अजित पवार यांनी विधानसभेत केला होता.

हेही वाचा Breaking news शिंदे गटाच्या आमदारांची विधानभवनाच्या पायऱ्यावर उतरून विरोधकांविरोधात घोषणाबाजी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.