ETV Bharat / city

Ajit Pawar on MLA Houses in Mumbai : ... तर मीडियाने आम्हाला ठोकले! आमदारांना घरे देण्याच्या निर्णयावरून अजित पवारांची मिश्कील टिप्पणी

author img

By

Published : Mar 26, 2022, 5:41 PM IST

उपमुख्यमंत्री अजित पवार ( Ajit Pawar on MLA houses ) म्हणाले, की मुख्यमंत्र्यांनी सांगितले की आमदारांना सदनिका देणार ( Flats for MLAs in Mumbai ) आहोत. सगळ्यांना फुकट देणार नाही. त्याची किंमत मोजावी लागणार आहे. ज्याचे घर आहे, त्यांना मिळणार नाही.

उपमुख्यमंत्री अजित पवार
उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबई- ठाकरे सरकारने मुंबईत आमदारांना घरे देण्याचा निर्णय घेतला ( Ajit Pawar on MLA houses in Mumbai ) आहे. हा निर्णय घेतल्यानंतर विरोधकांकडून टीकेसह जनेतमधून नाराजी व्यक्त होत आहे. सरकारच्या या निर्णयाबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मिश्किल टिपण्णी केलेली पाहायला ( Ajit Pawar explanation on government scheme ) मिळाली आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, की आम्ही नुसते आमदारांना घरे देणार असे सांगितले. तरी मिडीयाने आम्हाला ठोक-ठोक ठोकले.

हेही वाचा-Chitra Wagh Criticism On MP Sanjay Raut : 'ते' वक्तव्य म्हणजे संजय राऊत यांचे मानसिक संतुलन बिघडल्याचे लक्षण - चित्रा वाघ

आमदारांना मिळणाऱ्या घरावरून अजित पवारांचे स्पष्टीकरण
उपमुख्यमंत्री अजित पवार ( Ajit Pawar on MLA houses ) म्हणाले, की मुख्यमंत्र्यांनी सांगितले की आमदारांना सदनिका देणार ( Flats for MLAs in Mumbai ) आहोत. सगळ्यांना फुकट देणार नाही. त्याची किंमत मोजावी लागणार आहे. ज्याचे घर आहे, त्यांना मिळणार नाही. मी किंवा माझ्या पत्नीच्या नावाने घर आहे. त्यामुळे आम्हाला घर मिळणार नाही. पण, नुसते आमदारांना घर देतो म्हणालो तर मीडियाने आम्हला ठोकले, अशी मिश्किल टिपण्णी अजित पवार यांनी केली आहे.

हेही वाचा-Shivsena Leader Raghunath Kuchik : रघुनाथ कुचीक यांच्या प्रकरणात कोणताही राजकीय हस्तक्षेप होणार नाही- अजित पवार

आमदार निधी हा लोकांसाठीच..
उपमुख्यमंत्री म्हणाले, की त्याचबरोबर या वेळी सरकारला आमदार निधीदेखील वाढवून दिला आहे. त्यांच्या या निर्णयानंतर विरोधी पक्षांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली होती. याच्यावरदेखील आज अजित पवारांनी स्पष्टीकरण दिले आहे. लोकांमध्ये गैरसमज होतो, असे सांगतच अजित पवार यांनी अधिवेशन संपताना आम्ही आमदार निधी चार कोटींचा पाच कोटी केल्याचे सांगितले. आता काय आमदार हा निधी घरी घेऊन जाणार नाहीत. तर आपल्या मतदारसंघात विकास कामे करण्यासाठी दिला आहे, असे अजित पवार यावेळी म्हणाले.

हेही वाचा-Mumbai Rods close : मुंबईतील 13 रस्ते दर रविवारी घेणार मोकळा श्वास, पोलीस आयुक्तांची संकल्पना

सचिन वाझेला कुठून काय सुचले देव जाणे
पुणे ग्रामीण पोलीस मुख्यालयात आयोजित एका कार्यक्रमात पोलिसांना संबोधन करताना बदनामी होईल असे वागू नये, असा सल्ला दिला. त्यासाठी सचिन वाझे यांचे उदाहरण उपमुख्यमंत्र्यांनी दिले आहे.उपमुख्यमंत्री म्हणाले, की वाझेचे नाव खूप गाजले आहे. कुठून त्याला सगळ सुचले देव जाणो. पण आता कुठे जरी काही झाले तरी लोक म्हणतात येथे सचिन वाझे जन्माला आला. पूर्वी कुठे काय घडले की बोफार्स घोटाळा घडला असे म्हणायचे. तसे लोक बोलणार असे सांगतच अजित पवार यांनी पोलिसांना सरकार तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा असल्याचा विश्वासदेखील दिला आहे.

विधीमंडळात ४१० दहा मिनिटे वाया
अर्थसंकल्पीय अधिवेशन 3 मार्च ते २५ मार्च दरम्यान झाले. मात्र, या अधिवेशनात विधानसभेत एकूण झालेल्या बैठकीची संख्या पंधरा आहे. प्रत्यक्षात कामकाज १०६ तास ३० मिनिटे इतके झाले. रोजचे सरासरी काम सात तास दहा मिनिटे इतके झाले. सभागृह कधीकधी रात्री नऊ वाजेपर्यंत सुरू ठेवून कामकाज करण्यात आले. कधी सकाळी नऊ वाजता कामकाजाला सुरुवात झाली. मात्र, असे असले तरी विरोधकांनी कामकाजात घातलेला गोंधळ आणि अन्य कारणांमुळे सभागृहाचा वेळ ६ तास ५० मिनिटे इतका वाया गेला.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.