ETV Bharat / city

अजित पवारांनी पत्नी व मुलाच्या नावे बँकेत पैसे वळविले, सोमैयांचा आरोप - किरीट सोमैयांचा अजित पवारांवर आरोप

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांची पत्नी आणि मुलगा यांच्या नावे बँकेत पैसे वळविल्याचा दावा भाजप नेते किरीट सोमैयांनी केला आहे. दिवाळीच्या पहिल्या दिवशी सोमैयांनी केलेल्या आरोपांमुळे राजकीय वर्तुळात आता नवीन चर्चेला सुरूवात झाली आहे.

सोमैयांचे अजित पवारांवर गंभीर आरोप
सोमैयांचे अजित पवारांवर गंभीर आरोप
author img

By

Published : Nov 1, 2021, 3:55 PM IST

Updated : Nov 1, 2021, 4:52 PM IST

मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांची पत्नी आणि मुलगा यांच्या नावे बँकेत पैसे वळविल्याचा दावा भाजप नेते किरीट सोमैयांनी केला आहे. दिवाळीच्या पहिल्या दिवशी सोमैयांनी केलेल्या आरोपांमुळे राजकीय वर्तुळात आता नवीन चर्चेला सुरूवात झाली आहे.

अजित पवारांनी पत्नी व मुलाच्या नावे बँकेत पैसे वळविले, सोमैयांचा आरोप
मोहन पाटील, विजय पाटील, निता पाटील, सुनेत्रा पवार हे एका कंपनीमध्ये पार्टनर आहेत. अजित पवारांच्या कंपनीत अनेक विकासकांचे पैसे आले आहेत. ते पैसे परत देण्यात आले नाहीत. त्यांनी नीता पाटील, सुनेत्रा पवार, पार्थ पवार आणि एए पवार यांच्या खात्यात हे पैसे वर्ग केले. ए ए पवार हे अजित पवार यांच्या आईचं नाव आहे. आईच्या बँक अकाउंटचा वापर त्यांनी या पैशांसाठी केल्याचा आरोपही सोमैयांनी केला आहे.सध्या सुरू असलेल्या धाडसत्रावरून लोकांचे लक्ष वळविण्यासाठी मंत्री नवाब मलिक यांच्या माध्यमातून समीर वानखेडे यांचे प्रकरण बाहेर काढण्यात आले. 21 दिवसांत पवार कुटुंबियांचा सातबारा आम्ही ईडीच्या हातात दिला आहे. पवार कुटुंबीयांनी महाराष्ट्राला लुटले आहे. अजित पवार यांनी एक हजार कोटींपेक्षा अधिक रक्कम नातेवाईकांच्या खात्यात वर्ग केली आहे. ईडी आणि आयकर विभागाच्या धाडीतून हे सिद्ध झालं आहे असे आरोप सोमैयांनी केले आहे.

Last Updated : Nov 1, 2021, 4:52 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.