मुंबई - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे राष्ट्रवादी काँग्रेसवर ( CM Uddhav Thackeray ) नाराज असल्याचे चर्चेवर उपमुख्यमंत्री अजित पवार ( Ajit Pawar ) यांनी स्पष्टीकरण दिले आहे. आम्ही सगळे सोबत निर्णय घेतो, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले. आज मुंबईतील पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
काय म्हणाले अजित पवार - राज्यात महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आल्यापासून केंद्रीय तपास यंत्रणांकडून आघाडीतील नेत्यांवर कारवाईचा सिलसिला सुरू आहे. शिवसेनेने भाजप विरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. परंतु, राष्ट्रवादी काँग्रेस भाजपा विरोधात मावळ भूमिका घेत असल्याची नाराजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी थेट शरद पवार ( Sharad Pawar ) यांच्याकडे व्यक्त करताना राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना प्रमाणे आक्रमक व्हावे, असा आग्रह धरल्याचे बोलले जाते. अजित पवार यांना प्रसारमाध्यमांनी याबाबत विचारल्यानंतर, आम्ही एकटे काम करत नाही. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे, शरद पवार आणि सोनिया गांधी ( Sonia Gandhi ) यांनी मिळून महाविकास आघाडी तयार केली आहे. त्याबद्दल सर्व एकत्र मिळून निर्णय घेतो. काम करताना यावेळी एकमेकाला मदत कसे होईल, हाच प्रयत्न असल्याचे अजित पवार यांनी सांगितले.
अधिकाऱ्यांवर टीका टिप्पणी नको - केंद्र सरकार, राज्य सरकार, स्थानिक स्वराज्य संस्थामधील अधिकारी त्याचे काम योग्य पद्धतीने करत असेल, नियमाच्या अधीन राहून करत असेल तर कुठल्याही नागरिकांनी आजच्या अधिकाऱ्याच्या बद्दल वेगळ्या प्रकारची टीकाटिपणी करण्याचे अजिबात कारण नाही. अस काही घडत असेल तर कायदे-नियम आहेत. जर शासकीय कामांमध्ये कुणी अडथळा आणला, तर त्याबद्दल पण आपल्याला तक्रार करता येते आणि पुढची कारवाई करता येते. नियम तोडून कुणीच काम करण्याचा प्रयत्न करू नये, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.
हेही वाचा - Wife Should Give Dowry : विभक्त पत्नीने पतीला पोटगी द्यावी, नांदेड न्यायालयाचा निर्णय खंडपीठात कायम