ETV Bharat / city

वाझे प्रकरणात आपला काडीचा संबंध नाही : उपमुख्यमंत्री अजित पवार

पंढरपूर मंगळवेढा विधानसभेच्या पोटनिवडणुकीतील महाविकास आघाडीचे उमेदवार भगीरथ भालके यांच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार हे पंढरपूर दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी भाजपला टोला लगावला.

author img

By

Published : Apr 8, 2021, 5:44 PM IST

Updated : Apr 8, 2021, 5:56 PM IST

Deputy CM Ajit Pawar
उपमुख्यमंत्री अजित पवार

पंढरपूर - सचिन वाझे प्रकरणात आपला काडीचा संबंध नसताना आपले नाव घेतले जात आहे. त्याबाबत आपल्याला हसू येते. या प्रकरणावर महाविकास आघाडी सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न आहे का, याबाबत चौकशी करण्याची मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. भाजप नेते कल्याणराव काळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेश करण्यात आला.. त्यानंतर उपमुख्यमंत्री पत्रकार परिषदेत बोलत होते.

पंढरपूर मंगळवेढा विधानसभेच्या पोटनिवडणुकीतील महाविकास आघाडीचे उमेदवार भगीरथ भालके यांच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार हे पंढरपूर दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी भाजपला टोला लगावला. उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, त्यांना आधीच कसे कळते येत्या काही दिवसात विकेट पडणार आहे. या आरोपांमध्ये कोणतेही तथ्य नाही. या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली.

वाझे प्रकरणात आपला काडीचा संबंध नाही :

हेही वाचा-LIVE Updates : सचिन वाझे प्रकरणाचे ताजे अपडेट्स; वाचा एका क्लिकवर..

कोरोना महामारीत अशा प्रकारचे राजकारण करू नये-
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका करताना अजित पवार म्हणाले, की चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडीचे सरकार पाडण्यासाठी एखादे वर्ष सांगावे. महाविकास आघाडी सरकार पडणार, असे भाजप विधिमंडळापासून सांगत आहेत. मात्र महा विकास आघाडी सरकार हे पूर्ण बहुमत असणारे सरकार आहे. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली हे सरकार उत्तम काम करत आहे. कोरोना महामारीत अशा प्रकारचे राजकारण करू नये, असा सल्ला उपमुख्यमंत्र्यांनी चंद्रकांत पाटलांना दिला.

हेही वाचा-15 दिवसांत आणखी दोन-तीन मंत्र्यांचा राजीनामा -चंद्रकांत पाटील

कार्यकर्त्यांची गर्दी झाल्याबद्दल दिलगिरी व्यक्त-
चंद्रभागा साखर कारखान्याचे अध्यक्ष कल्याणराव काळे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेशाच्या निमित्ताने आयोजित सभेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी एकच गर्दी केली होती. त्याबद्दल माध्यम प्रतिनिधींनी विचारलेल्या प्रश्नावर उपमुख्यमंत्री अजितदादा यांनी कार्यकर्त्यांनी जमविलेल्या गर्दीबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे. अजित पवार म्हणाले, पंढरपूर मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये किती नियम पाळण्याचा प्रयत्न केला तरी गर्दी होणारच आहे. तरी कार्यकर्त्यांनी कोरोना नियमांचे पालन कराव, असे आवाहन केले.

टाळेबंदीबाबत मुख्यमंत्री घेणार निर्णय
सध्या राज्यात कोरोनाचा संक्रमण दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे राज्य सरकारने काही प्रमाणात टाळेबंदी करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र यामुळे व्यापाऱ्यांचे नुकसान होताना दिसत आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी दुसरा कोणते उपाय योजना करता येतील का याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लवकरच निर्णय घेण्याची शक्यता यावेळेस त्यांनी बोलून दाखविली.

महाराष्ट्राला जास्त लस देण्याची अजित पवारांची केंद्राकडे मागणी-
कोरोनाच्या लसीकरणाबाबत उपमुख्यंत्री अजित पवार म्हणाले की, राज्यात कोरोनाचा संक्रमण वाढला आहे. त्यामुळे महाराष्ट्रात जास्त प्रमाणावर लसीकरण करणे गरजेचे आहे. त्यासाठी केंद्र सरकारकडे आम्ही जास्त लसीची मागणी करत आहोत. मात्र केंद्र सरकार राज्यांमध्ये दुजाभाव करून लस कमी प्रमाणात देत आहे. दुसऱ्या राज्यात जास्त लगेच दिली जात आहे. तसेच राज्यातील 18 वर्षांवरील प्रत्येक व्यक्तीला देण्यात यावी अशी मागणीही करण्यात आली.

काय केली होती चंद्रकात पाटील यांनी टीका?
मुंबईत आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये चंद्रकांत पाटील यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. यावेळी त्यांनी पुन्हा एकदा आगामी 15 दिवसात सरकारच्या आणखी दोन-तीन मंत्र्यांचा राजीनामा घेण्याची वेळ येईल, असे म्हटले आहे. क्रिकेटमध्ये जसे सुरुवातीचे दोन फलंदाज बाद व्हायला वेळ लागतो. त्यानंतर पुढचे फलंदाज हे पटापट ढेपाळतात असा टोला चंद्रकांत पाटील यांनी महाविकासआघाडी सरकारला लगावला. मी राष्ट्रपती राजवट लागू करावी, अशी मागणी करत नाही. पण आता तुम्ही राष्ट्रपती राजवट लागू न करण्यासाठी काय शिल्लक ठेवले आहे, असा सवालदेखील भाजप प्रदेशाध्यक्ष यांनी महाविकास आघाडी सरकरला विचारलेला आहे.

Last Updated : Apr 8, 2021, 5:56 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.