ETV Bharat / city

उद्धव ठाकरेंना मोठा झटका.. शिवसेनेच्या गटनेते पदावरून अजय चौधरी व प्रतोद पदावरून सुनील प्रभू यांना हटवले - शिवसेना गटनेते पदावरून अजय चौधरी यांना हटवले

शिवसेनेचे आमदार अजय चौधरी ( Ajay Chaudhary removed as legislative party leader ) यांना गटनेतेपदावरून, तर सुनील प्रभू यांना प्रतोद पदावरून ( Sunil Prabhu removed from chief whip post of Shiv Sena ) हटवण्यात आले आहे. काल विधिमंडळ सचिवांकडून पत्र जाहीर करण्यात आले असून यामध्ये या दोघांची नियुक्ती रद्द करण्यात आली असून एकनाथ शिंदे यांची शिवसेनेचे गटनेतेपदी ( Eknath shinde shivsena legislative party leader ) तर भरत गोगावले यांची प्रतोदपदी ( Bharat Gogavale shivsena chief whip ) झालेली नियुक्ती मान्य करण्यात आली आहे. हा उद्धव ठाकरेंसाठी मोठा झटका मानला जात आहे.

Ajay Chaudhary removed as legislative party leader
शिवसेना गटनेते पदावरून अजय चौधरी यांना हटवले
author img

By

Published : Jul 4, 2022, 6:41 AM IST

मुंबई - राज्यात नाट्यमय सत्तांतर झाल्यानंतर खरी शिवसेना कुठली? उद्धव ठाकरे यांची की, एकनाथ शिंदे यांची, यावरून राज्यभर राजकीय चर्चांना उधाण आले होते. काल अध्यक्षपदाच्या निवडणुकीत उद्धव ठाकरे ( Ajay Chaudhary removed as legislative party leader ) यांच्या शिवसेनेकडून प्रतोद सुनील प्रभू यांनी व्हीप जारी करून सुद्धा बंडखोरी केलेल्या एकनाथ शिंदे गटाच्या आमदारांनी पक्षाच्या विरोधात ( Sunil Prabhu removed as chief whip post ) जाऊन भाजपचे उमेदवार राहुल नार्वेकर यांना मतदान केले. यावरून सुद्धा त्यांच्यावर कुठली कारवाई होणार? यावर चर्चा रंगली असताना आता विधानमंडळ सचिवांनी शिवसेनेचे गटनेते म्हणून एकनाथ शिंदे ( Eknath shinde shivsena legislative party leader ), तर प्रतोद म्हणून भरत गोगावले यांची नियुक्ती ( Bharat Gogavale shivsena chief whip ) करत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना गटाला मोठा धक्का दिला आहे. तसे पत्र त्यांनी एकनाथ शिंदे व भरत गोगावले यांना दिले आहे.

हेही वाचा - Vidhan Sabha Floor Test : उद्या विधानसभेत होणाऱ्या बहुमत चाचणी संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक

विधिमंडळात शिवसेना उद्धव ठाकरेंची नाही, तर शिंदेंची? - शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी बंडाळी केल्यानंतर २२ जून रोजी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून आमदार अजय चौधरी यांची गटनेतेपदी निवड करण्यात आली होती. तसे पत्र त्यांनी विधिमंडळ सचिवांना दिले होते. यावरून बऱ्याच दिवसांपासून राजकीय खलबत रंगली होती. एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यामुळे त्यांचा गट अनधिकृत असून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा गट अधिकृत असल्याची चर्चाही रंगली होती. तर दुसरीकडे एकनाथ शिंदे गटाकडे दोन तृतीयांश पेक्षा जास्त आमदार असल्याकारणाने आमचे आमदार हे अधिकृत गटाचे आमदार आहेत, असे एकनाथ शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर हे वारंवार सांगत आले आहेत.

अजय चौधरी व सुनील प्रभू यांची नियुक्ती रद्द - अखेर काल विधिमंडळ सचिवांकडून पत्र जाहीर करण्यात आले असून यामध्ये शिवसेनेकडून गटनेतेपदी निवड करण्यात आलेले आमदार अजय चौधरी यांची नियुक्ती रद्द करण्यात आली आहे. शिवसेनेचे गटनेते म्हणून एकनाथ शिंदे यांची नियुक्ती कायम करण्यात आली आहे. त्याचबरोबर, मुख्य प्रतोद म्हणून आमदार सुनील प्रभू यांची केलेली नियुक्ती रद्द करून त्याऐवजी आमदार भरत गोगावले यांची मुख्य प्रतोदपदी करण्यात आलेली नियुक्ती कायम ठेवण्याच्या प्रस्तावास मान्यता देण्यात आली आहे.

काय आहे पत्रात? - संदर्भाधिन पत्राच्या अनुषंगाने मला आपणास असे कळविण्याचे निर्देश आहेत की, शिवसेना विधिमंडळ गटनेते पदावरून श्री एकनाथ शिंदे, वि.स.स. यांना दूर करून श्री अजय चौधरी, वि.स.स. यांची निवड करण्यात आली होती. याबाबत आपणामार्फत दिनांक २२ जून, २०२२ रोजीच्या पत्रान्वये आक्षेप नोंदविण्यात आला आहे.
याबाबतीतील कायदेविषयक तरतुदींचा ऊहापोह करून मा. अध्यक्ष, महाराष्ट्र विधानसभा यांनी श्री. अजय चौधरी, वि.स.स. यांना शिवसेना विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून दिलेली मान्यता रद्द करून श्री. एकनाथ शिंदे, वि.स.स. यांची दिनांक ३१ ऑक्टोबर, २०१९ रोजी गटनेते म्हणून करण्यात आलेली नियुक्ती कायम करत श्री. सुनिल प्रभू. वि.स.स. यांची मुख्य प्रतोद म्हणून केलेली नियुक्ती रद्द करून त्याऐवजी श्री. भरत गोगावले वि.स.स. यांची मुख्य प्रतोद पदी करण्यात आलेली नियुक्ती कायम ठेवण्याच्या आपल्या प्रस्तावास मान्यता दिली आहे. त्यानुसार अभिलेखात नोंद घेण्यात येत आहे.

उद्धव ठाकरे यांना मोठा झटका - अजय चौधरी यांची गटनेते म्हणून मान्यता रद्द केली गेल्याने, तसेच सुनील प्रभू यांचीही मुख्य प्रतोद म्हणून केलेली नियुक्ती रद्द केली गेल्याने हा उद्धव ठाकरे यांच्यासाठी फार मोठा झटका मानला जात आहे. जर उद्या गटनेते एकनाथ शिंदे व मुख्य प्रतोद भरत गोगावले यांनी एखादा निर्णय घेतला व आत्ता उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना गटात उरलेल्या १६ आमदारांनी त्या निर्णयाविरोधात भूमिका बजावली. तर या १६ आमदारांवर कारवाई करण्याचा अधिकार एकनाथ शिंदे यांना असणार आहे. या निर्णयाच्या विरोधामध्ये उद्धव ठाकरे यांच्याकडून न्यायालयामध्ये दाद मागितली जाणार आहे. विशेष म्हणजे, आज होणाऱ्या बहुमत चाचणी दरम्यान शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे १६ आमदार काय भूमिका घेतात याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा - Ashok Chavan Criticizes Governor : राज्यपालांच्या कार्यपध्दतीचा अशोक चव्हाण यांनी उघडला पेटारा

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.