मुंबई - एड्स या महाभयंकर रोगाने दोन दशकांपूर्वी राज्यात थैमान घातले होते. या रोगाविषयी नागरिकांमध्ये कमालीची भीती आणि चिंता होती. रुग्णाची प्रतिकारशक्ती कमी करून त्याला सहव्याधी सहज जडल्या जात होत्या. लैंगिक संसर्गातून मुख्यत्वे हा रोग पसरला जात होता, मात्र आता या रोगाची राज्यात भीती कमी होऊ लागली आहे. (AIDS patients in Maharashtra) २००७ च्या तुलनेत आता राज्यात केवळ १४ टक्के रुग्ण शिल्लक आहेत, अशी माहिती महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्थेचे (Maharashtra State AIDS Control Institute) मुख्य नियंत्रक चंद्रकांत डांगे यांनी दिली आहे.
राज्यातील एड्स रुग्णांचे सद्यस्थितीतील प्रमाण -
२००७ मध्ये पाच लाख २३ हजार २३४ जणांची तपासणी केल्यानंतर ५९ हजार ६२५ बाधित रुग्ण आढळले होते. २०१० मध्ये १४ लाख २७ हजार ७३८ रुग्णांची तपासणी केल्यानंतर त्यातील ६७ हजार ९९७ जणांना एड्सची बाधा झाल्याचे समोर आले होते. हे प्रमाण आता अत्यल्प झाले आहे. २०२१ मध्ये २५ लाख ७० हजार ७५३ जणांची तपासणी केल्यानंतर केवळ ९ हजार ४९७ बाधित रुग्ण (AIDS patients in Maharashtra) आढळले आहेत.
गरोदर महिला एड्स बधितांचे प्रमाण -
राज्यातील गरोदर महिलांच्या एड्स बाधित होण्याच्या प्रमाणात ही लक्षणीय घट झाली आहे. २००७ मध्ये सहा लाख ४५ हजार ९४९ गरोदर महिलांची चाचणी केल्यानंतर ४५५२ एक्स बाधित रुग्ण असल्याचे समोर आले होते. २०१० मध्ये दहा लाख ३९ हजार ७५७ महिलांची तपासणी केली असता हे प्रमाण कमी होऊन ३३६१ इतके झाल्याचे समोर आले होते. गरोदर महिलांच्या एड्सबाधित होण्याचे प्रमाण आणखी कमी होऊन आता २०२१ मध्ये वीस लाख १४ हजार ९०४ महिलांची तपासणी केली असता केवळ ६३० महिला एड्सबाधित असल्याचे समोर आले आहे अशी माहिती डांगे यांनी दिली.
एड्स बाधितांना एकात्मिक सल्ला आणि चाचणी केंद्र -
महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था (Maharashtra State AIDS Control Institute) अंतर्गत ३४ जिल्ह्यांमध्ये ४९६ स्वावलंबी आयसीटीसी केंद्रे आहेत. ६ मोबाईल आयसीटीसी केंद्र दोन आयसीटीसी केंद्र आणि दहा पीपीई केंद्र आहेत. अशा एकूण ५३१ आयसीटीसी केंद्रांमार्फत बाधित रुग्णांवर उपचार केले जातात. याशिवाय राज्यातील अठराशे अकरा प्राथमिक आरोग्य केंद्रे ९२ ग्रामीण रुग्णालय १६६ शहरी आरोग्य केंद्रे 1,356 पीपी केंद्रे आणि 35 आयसीटीसी अशा एकूण तीन हजार ४५४ आयसीटीसी केंद्रांमार्फत उपचार पुरवले जातात. राज्यातील ग्रामीण रुग्णालय स्तरापर्यंत समुपदेशनाची आणि चाचणीची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे, असेही डांगे यांनी सांगितले.
AIDS patients in Maharashtra : राज्यातील एड्स रुग्णांमध्ये लक्षणीय घट - महाराष्ट्रातील एड्स रुग्णांची संख्या
एड्स या महाभयंकर रोगाची दहशत आता कमी होताना दिसते आहे. एकेकाळी ६० हजारांपेक्षा अधिक रुग्ण असलेल्या महाराष्ट्रात ही संख्या (AIDS patients in Maharashtra) आता नऊ हजार रुग्णांवर येऊन ठेपली आहे. ही घट लक्षणीय असल्याचे एड्स नियंत्रक संस्थेचे म्हणणे आहे.