मुंबई - कोरोनामुळे घरातील आधारवड गमावलेल्या कुटुंबाला ५० हजारांची (Aid For Covid Positive Families) मदत देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या संदर्भातील परिपत्रक नुकतेच जाहीर केले आहे. उदरनिर्वाहाचे दिव्यसंकट समोर असलेल्या कुटुंबियांना यामुळे दिलासा मिळणार आहे.
महसूल विभागाकडून परिपत्रक जाहीर -
कोरोनामुळे गेल्या दीडवर्षांत हजारो लोकांचा मृत्यू झाला. अनेकांच्या घरातील कुटुंबप्रमुख या कालावधीत दगावले. कर्त्या व्यक्तीचा मृत्यू झाल्याने अनेकांचे संसार उघड्यावर पडले. न्यायालयात या प्रकरणी याचिका दाखल केली होती. न्यायालयाने सरकारला मदत करण्याचे आदेश दिले होते. संबंधित नातेवाईकांची आधार कार्डद्वारे ओळख पटवून ती बँक खात्यात जमा करावी. संगणकीय प्रणाली यासाठी विकसित करावी, अशा सूचना दिल्या होत्या. त्यानुसार राज्यात जी व्यक्ती कोरोनामुळे निधन पावली आहे. त्या मृत व्यक्तीच्या निकट नातेवाईकास ५० हजार रुपयांची मदत देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. महसूल व वन विभागाने यासंदर्भातील परिपत्रक नुकतच जाहीर केले.
कोणाला मिळेल मदत -
- कोरोनामुळे व्यक्तीचा मृत्यू हा रुग्णालयात कोरोना निदान झाल्याच्या दिनांकापासून ३० दिवसाच्या आत झाला असेल तर त्याला कोरोनाचा मृत्यू गृहीत धरले जाईल
- कोरोनाच्या निदानामुळे आत्महत्या केली असल्यास ही मदत मिळेल
- कोरोनामुळे बरी झालेली नव्हती, अशा प्रकरणातील व्यक्तीचा मृत्यू रुग्णालयात किंवा घरामध्ये झालेला आहे
- व्यक्तीच्या मृत्यू प्रकरणी जन्म व मृत्यू नोंदणी अधिनियम, 1969 च्या कलम 10 खाली Medical Certificate of Cause of Death (MCCD) हे Form 4 व 4 A मध्ये नोंदणी प्राधिकाऱ्याला निर्गमित केले आहेत, अशा व्यक्तीचा मृत्यू कोरोनाचा मृत्यू समजण्यात येईल.
- Medical Certificate and of Cause of Death (MCCD) मध्ये “कोव्हिड-19 मुळे मृत्यू" याप्रमाणे नोंद नसली तरीही अटीची पूर्तता होत असल्यास, ती प्रकरणे 50,000 रुपये मदत देण्यात येईल.
हेही वाचा - MLC Election 2021 : विधानपरिषदेच्या चार जागा बिनविरोध, तर दोन जागांवर होणार लढत