ETV Bharat / city

'वाडिया रुग्णालय बंद करण्याचा डाव'

वाडिया रुग्णालयाच्या जागेत पुनर्विकास करण्यासाठी डाव आखल्याचा आरोप भाजप नेते अशिष शेलार यांनी केला आहे. भाजप हे रुग्णालय बंद होऊ देणार नाही, असा इशारा त्यांनी यावेळी दिला

ashish shelar on wadiya hospital
वाडिया रुग्णालयाच्या जागेत पुनर्विकास करण्यासाठी डाव आखल्याचा आरोप भाजप नेते अशिष शेलार यांनी केला
author img

By

Published : Jan 14, 2020, 11:40 AM IST

मुंबई - परळ येथील वाडिया रुग्णालय प्रशासनाने 'बाई जेरबाई वाडिया' आणि 'नौरोजी वाडिया' ही दोन्ही रुग्णालये बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. यामागे महानगरपालिकेकडून अनुदान थकित असल्याचे कारण पुढे करण्यात आले. परंतु, वाडिया रुग्णालयाच्या जागेत पुनर्विकास करण्यासाठी डाव आखल्याचा आरोप भाजप नेते अशिष शेलार यांनी केला आहे. तसेच भाजप हे रुग्णालय बंद होऊ देणार नाही, असा इशारा त्यांनी यावेळी दिला आहे. शहरात जागेची किंमत मोठी आहे. यासाठीच हे रुग्णालय बंद करण्याचा डाव आहे, असे शेलार म्हणाले.

वाडिया रुग्णालयाच्या जागेत पुनर्विकास करण्यासाठी डाव आखल्याचा आरोप भाजप नेते अशिष शेलार यांनी केला

90 वर्षांपेक्षा जुने असलेले हे रुग्णालय गिरणी कामगार तसेच गरिबांसाठी पालिका आणि ट्रस्टच्या करारातून तयार झाले आहे, अशी माहिती त्यांनी दिली. वाडिया प्रकरणात 'तेरी भी चूप; मेरी भी चूप' अशी मनपा आणि प्रशासनाची भूमिका असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

याआधी आवश्यक असणाऱ्या परवानग्या पालिका देत नसल्याचे वाडिया ट्रस्टने सांगितले. यानंतर वाडिया ट्रस्ट खासगीकरण करत असल्याचा आरोप पालिकेने केला. आता रुग्णालय चालवायला पैसा नाही. ही नुराकुस्ती आहे, असे शेलार म्हणाले. हा एका प्रकारचा 'व्हाईट कॉलर क्राईम' आहे, असे ते म्हणाले.

नायगाव येथे वाडिया यांचा प्रोजेक्ट होत असून त्यानंतर वाडिया रुग्णालयाच्या जागेवर त्यांचा डोळा आहे, असे शेलार म्हणाले. तसेच वाडिया रुग्णालय बंद केल्यास रस्त्यावर उतरण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

Intro:मुंबई

मुंबई महानगरपालिकेकडून अनुदान थकित असल्याचे कारण देत परळ येथील वाडिया रुग्णालय प्रशासनाने बाई जेरबाई वाडिया आणि नौरोजी वाडिया ही दोन्ही रुग्णालये बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. वाडिया रुग्णालयाची जागेत पुनर्विकास करण्यासाठी हा डाव आहे. आम्ही हे रुग्णालय बंद होऊ देणार नाही असा इशारा भाजप नेते आशिष शेलार यांनी दिला आहे.
Body:मुंबई शहरात मध्ये जागेची किंमत मोठी आहे. यासाठीच हे रुग्णालय बंद करण्याचा डाव आहे. 90 वर्षांपेक्षा जुने हे रुग्णालय आहे. गिरणी कामगार आणि गरिबांसाठी महापालिका आणि ट्रस्टच्या करारातुन हे रुग्णालय तयार झाले आहे. वाडिया ट्रस्ट सांगत की ज्या परवानगी मागत त्या पालिका देत नाही. पालिका सांगते ते खासगीकरण करत आहे. आता सांगत आहे रुग्णालय चालवायला पैसा नाही. ही नुराकुस्ती आहे. जर धर्मादाय आयुक्तांच्या परवानगी शिवाय रुग्णालय बंद करायचे असेल तर काही वाद असला पाहिजे यासाठी या प्रकारेच वाईट कॉलर ने हा रुग्णालय बंद करण्याचा डाव आहे. नायगाव येथे वाडिया यांचा प्रोजेक्ट होत आहे त्यानंतर वाडीया रुग्णालयाच्या जागेवर त्यांचा डोळा आहे असा आमचा आरोप आहे. जर वाडिया रुग्णालय बंद करणार असतील तर आम्ही रत्यावर उतरून आंदोलन उभे करू असे शेलार यांनी सांगितले.
Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.