ETV Bharat / city

suspicious boat in Raigad रायगडमध्ये पुन्हा आढळली संशयास्पद बोट, पोलिसांचा तपास सुरू - रायगडमध्ये पुन्हा आढळली संशयास्पद बोट

गस्त विभाग गस्त घालत असताना ही बोट रविवारी रात्री ( Sunday night patrolling ) सापडली. डिझेल चोरीसाठी बोट वापरण्यात येत असल्याचा संशय प्राथमिकदृष्ट्या वर्तवण्यात येत असल्याची माहिती पोलिसांनी दिली. गेल्या महिन्यात देखील १८ ऑगस्टला रायगड जिल्ह्याच्या हरिहरेश्वरच्या समुद्र किनाऱ्यावर ( beach of Harihareshwar in Raigad  ) १८ ऑगस्टला सकाळी संशयित बोट आढळून आली होती.

suspicious boat in Raigad
suspicious boat in Raigad
author img

By

Published : Sep 26, 2022, 8:25 PM IST

मुंबई - उरण येथील करंजाजवळच्या समुद्रात संशयास्पद मासेमारी ( suspicious fishing boat ) बोट आढळल्याने खळबळ उडाली आहे. विना नंबरप्लेट असलेली बोट सापडल्याने ( boat without a number plate ) ही बोट पोलिसांनी ताब्यात घेण्याली आहे.

गस्त विभाग गस्त घालत असताना ही बोट रविवारी रात्री ( Sunday night patrolling ) सापडली. डिझेल चोरीसाठी बोट वापरण्यात येत असल्याचा संशय प्राथमिकदृष्ट्या वर्तवण्यात येत असल्याची माहिती पोलिसांनी दिली. गेल्या महिन्यात देखील १८ ऑगस्टला रायगड जिल्ह्याच्या हरिहरेश्वरच्या समुद्र किनाऱ्यावर ( beach of Harihareshwar in Raigad ) १८ ऑगस्टला सकाळी संशयित बोट आढळून आली होती. रात्री आढळलेल्या बोटीमागे कोणता घातपात करण्याचा हेतू होता का? या अनुषंगाने पोलीस तपास करत आहे.

गेल्या महिन्यात आढळली होती संशयास्पद बोट गेल्या महिन्यात सापडलेल्या संशयित बोटीत शस्त्रसाठा सापडल्यामुळे राज्यभरात या बोटीबाबत तर्कवितर्क लढवले जात होते. बोटीमध्ये सापडलेल्या रायफल आणि काडतुसामुळे या बोटद्वारे राज्यात काही घातपात करण्याचा कोणाचा डाव होता का, असा संशय व्यक्त केला जात होता. मात्र तसे काहीही नसल्याचे एटीएसकडून स्पष्ट करण्यात आले आहे या बोटीत तीन AK-47 व 247 जिवंत काडतुसे सापडली होती. एटीएसने अधिकृतरीत्या या बोटीशी संबंधित लोकांची संपूर्ण माहिती मागवली होती.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.