ETV Bharat / city

'गोवा, यूपीतील भाजप विजयानंतर महाराष्ट्रात धाकधूक' - महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी

भारतीय जनता पक्षाने उत्तर प्रदेशात पुन्हा एकदा मुसंडी मारत विजय प्राप्त केला आहे. २५५ जागा मिळवून उत्तर प्रदेशात भाजपाने बहुमत मिळवले आहे तर गोव्यातही २० जागा मिळवत बहुमताचा आकडा जवळपास गाठला. या दोन्ही राज्यांमध्ये झालेल्या या निवडणुकीच्या निकालाचा महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीवर परिणाम होणार आहे. असे राजकीय विश्लेषकांनी म्हटले आहे.

BJP victory
भाजपा
author img

By

Published : Mar 12, 2022, 5:26 PM IST

मुंबई - गोवा आणि उत्तर प्रदेश या दोन महत्त्वाच्या विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपाने मिळवलेल्या विजयाचा महाराष्ट्रावर थेट परिणाम होणार आहे. भाजपला अधिक बळ मिळाले असून आता राज्य सरकारच्या विरोधातील कारवाया अधिक तीव्र होतील आणि सरकार अडचणीत येईल, असे मत राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केले आहे.

'महा विकास आघाडीतील घटक पक्षांचे धाबे दणाणले'

भारतीय जनता पक्षाने उत्तर प्रदेशात पुन्हा एकदा मुसंडी मारत विजय प्राप्त केला आहे. २५५ जागा मिळवून उत्तर प्रदेशात भाजपाने बहुमत मिळवले आहे तर गोव्यातही २० जागा मिळवत बहुमताचा आकडा जवळपास गाठला. या दोन्ही राज्यांमध्ये झालेल्या या निवडणुकीच्या निकालाचा महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीवर परिणाम होणार आहे. याचे कारण महाराष्ट्रातील महाविकास आघाडीच्या घटक पक्षांनी या दोन्ही राज्यात निवडणुकीच्या रिंगणात आपले नशीब आजमावले होते. दोन्ही राज्यांमध्ये काँग्रेसची पडझड थांबली नाही आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचे सारख्या पक्षांना आपले डिपॉझिटही वाचवता आले नाही. यामुळे भाजपला आणि पर्यायाने विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना अधिक बळ मिळाले असून ते त्वेषाने महा विकास आघाडी सरकारवर वार करू लागले आहेत. सरकार अस्थिर करण्याची एकही संधी भाजपा गमावताना दिसत नाही. हे सरकार आपला कार्यकाल पूर्ण करू शकेल असा दावा सरकारकडून होत असला तरी महा विकास आघाडीतील घटक पक्षांचे धाबे या निकालाने दणाणले आहे इतके नक्की, असे राजकीय विश्लेषकांनी सांगितले आहे.

आगामी निवडणुका महाविकास आघाडी सरकारसाठी कठीण -

राज्यात नुकताच झालेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमध्ये महा विकास आघाडी सरकारला भाजपा पेक्षा किंचित जास्त जागा मिळाल्या असल्या तरीही भाजपाच्या जागा फार कमी झालेल्या नाहीत. उलट गोवा आणि उत्तर प्रदेशच्या निकालानंतर भाजपाची लाट किंवा जादू ओसरली असे म्हणणारा काठावरचा मतदार पुन्हा भाजपाकडे वळण्याची शक्यता निर्माण झाली आहे, असे मत राजकीय विश्लेषक चंदन शिरवाळे यांनी व्यक्त केले. त्यामुळे आगामी निवडणुकांमध्ये भाजपची ताकद वाढू शकते आणि त्याचा थेट फटका महा विकास आघाडी सरकारला बसू शकतो, असे शिरवाळे यांचे मत आहे.

भाजपा अधिक मजबूत -

गेल्या काही महिन्यांपासून राज्यपालांच्या माध्यमातून महा विकास आघाडी सरकारवर अंकुश ठेवण्याचा प्रयत्न भाजपा करीत आहे. उत्तर प्रदेशात मिळालेली सत्ता आणि गोव्यात मिळालेले व्यवसाय हे भाजपाच्या या प्रयत्नांना अधिक बळ देणारे ठरणार आहेत. देवेंद्र फडणवीसाचे अतिशय महत्त्वाकांक्षी नेते आहेत. त्यांनी सरकारच्या विरोधात सुरू केलेली मोहीम आता ते अधिक तीव्र करून सरकार कसे अडचणीत येईल आणि लवकरात लवकर सत्तापालट होईल, यासाठी प्रयत्नशील राहणार यात शंका नाही. त्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणांची मदत अप्रत्यक्षरीत्या घेतली जात असल्याचे गेल्या काही काळापासून दिसून येत आहेच. सरकारवर एक प्रकारचा आपोआप आता दबाव निर्माण झाला आहे. आणि त्यामुळे भाजपाची आणि देवेंद्र फडणवीस यांची ताकद अधिक वाढली असल्याचे मत राजकीय विश्लेषक विवेक भावसार यांनी व्यक्त केले. मुंबईतील मोदी पासून दुरावत चाललेल्या उत्तर भारतीय मतदारांमध्ये पुन्हा एकदा चलबिचल सुरू झाली आहे, तर गोव्याला लागून असलेला कोकणी माणूस पुन्हा एकदा प्रभावित होण्याची शक्यता नाकारता येत नाही असेही भावसार यांचे म्हणणे आहे.

हेही वाचा - फडणवीसांसाठी स्टिंग ऑपरेशन केल्याचा आरोप.. तेजस मोरेवर आहे खंडणीचा गुन्हा.. 'जळगाव' कनेक्शन उघड

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.