मुंबई - सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला एक व्हिडिओ लोकांना भावूक करत आहे. या व्हिडिओमध्ये दोन सख्खे भाऊ 74 वर्षांनंतर एकमेकांना भेटत आहेत. (After 74 years two brothers meet in Kartarpur Sahib Corridor) कर्तारपूर साहिब कॉरिडॉरवर विभक्त झालेले हे दोन भाऊ 74 वर्षांनंतर भेटले आहेत. (Separared During partition) देशाच्या फाळणीच्यावेळी दोन्ही भाऊ बिखरले होते. (Two Brothers Meet Separared During Partition) इतक्या वर्षांनी दोघे भेटले तेव्हा त्यांचे डोळे भरून आले. ते बराच वेळ रडत होते. मुहम्मद सिद्दीक आणि त्यांचे भाऊ हबीब उर्फ शेला अशी दोन्ही भावांची नावे आहेत.
मोठ्या भावाची माहिती घेण्याचा खूप प्रयत्न केला
मुहम्मद सिद्दिक यांचे वय आता 80 असून ते पाकिस्तानातील फैसलाबाद शहरात राहतात. त्यांचा भाऊ हबीब उर्फ शेला हा भारतातील पंजाबमध्ये राहतो. (After 74 years two brothers meet in Kartarpur Sahib Corridor) मीडिया रिपोर्ट्सनुसार, फाळणीच्यावेळी हबीब आपल्या आईसोबत पंजाबमध्ये असलेल्या आपल्या आजीच्या घरी आला होता. फाळणीनंतर नरसंहार सुरू झाला तेव्हा तो पाकिस्तानात जाऊ शकला नाही. दरम्यान, कुटुंबीयांनी वडील आणि मोठ्या भावाची माहिती घेण्याचा खूप प्रयत्न केला. मात्र, तो काही सापडला नाही.
भान हरपल्याने आईचेही निधन
अनेक वर्षांनंतर, पाकिस्तानमधील मुहम्मद सिद्दिकच्या ओळखीच्या लोकांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ टाकला, ज्यामध्ये तो 1947 च्या घटनेचा संदर्भ देत होता. यानंतर दोन्ही भावांना एकमेकांची माहिती झाली. दोन्ही कर्तारपूर कॉरिडॉरद्वारे जोडले गेले होते. यादरम्यान करतार साहिब गुरुद्वाराचे अधिकारीही उपस्थित होते. तेही व्हायरल व्हिडिओमध्ये दिसत आहेत. मीटिंगमध्ये हबीबने सिद्दीकला सांगितले की, इतकी वर्षे भारतात राहून आपण लग्न केले नाही. तसेच, या घटनेमुळे भान हरपल्याने आईचेही निधन झाले आहे.
हेही वाचा - Court Hearing : जेल की बेल? अनिल देशमुख आणि नितेश राणेंच्या याचिकेवर आज सुनावणी