मुंबई - देशातील पहिले दुमजली ‘वॉटर रिसायकलिंग कम्युनिटी टॉयलेट’ घाटकोपरमध्ये उभारण्यात आले आहे. यामध्ये महिला व पुरुषांसाठी शौचकूपे असण्याबरोबरच वॉशिंग मशिन, स्नान, मुतारी, शुद्ध पिण्याचे पाणी यांची व्यवस्था करण्यात आली आहे. या टॉयलेटचा वापर वर्षभरात २० हजार लोकांना करता येईल. शुक्रवारी या वास्तूंचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. या अत्याधुनिक टॉयलेटमधून पाण्याचा एकही थेंब बाहेर जाणार नाही. सर्व पाण्यावर प्रक्रिया केली जाईल. अशी टॉयलेट मुंबईत जास्त बांधली जातील. धारावीत अशाच प्रकारे १११ शौचकुपे बांधली जात असल्याचेही आदित्य यांनी सांगितले.

काय आहेत या टॉयलेटची वैशिष्टये
या अत्याधुनिक टॉयलेटमधून एकही थेंब बाहेर जाणार नाही. सर्व पाण्यावर प्रक्रिया केली जाईल. अशी टॉयलेट मुंबईत अधिक बांधली जाणार आहेत. धारावीत अशाच प्रकारे १११ शौचकुपे बांधली जात आहेत. कोस्टल रोडचे काम जलदगतीने सुरू आहे. मुंबईतल्या विकासकामांचा प्रत्येक आठवड्याला आढावा घेतला जाईल.

नाट्य तसेच चित्रपटगृहांबाबत विचार सुरू
मुलांबाबतीत किती धोका पत्करायचा असा प्रश्न आहे. त्यांचे लसीकरण झालेले नाही. त्यामुळं त्यांना धोक्यात टाकू शकत नाही. थोडा विचार करून पुढं जात आहोत. डिसेंबर जानेवारीमध्ये सगळ्यांचाच पॉझिटीव्ही रेट कमी होता. ९० ते १०० दिवस काही देश उच्चांक गाठतात. व काही देशांत कमी रूग्ण असतात. नाटयगृह,चित्रपटगृहे सुरू करण्याबाबत विचार सुरू आहे. पण ते सुरू करताना काळजी घेणेही गरजेचे आहे असे आदित्य यांनी सांगितले.
पेडणेकरांचा चित्रा वाघ यांनी टोला
त्यांना जरा प्रोटोकॉल समजावून सांगा. मी मुंबईची महापौर असल्यानं मुंबईत जेथे बरे वाईट घडते तेथे मी जात आहे. मी डोंबिवलीतही जाईन पण त्या सांगत आहेत म्हणून मी नाही जाणार. ते हेरून अजेंडा चालवत आहेत. जास्त भाईगिरी नाही करायची. आम्हाला शिकवायला जावू नका. बाडगे जोरात बांग देतात, तसं आहे यांचे. खोटे रडणं आम्हाला नाही जमत, असा टोला किशोरी पेडणेकर यांनी वाघ यांनी लगावला.
हेही वाचा - धक्कादायक! दिल्लीत न्यायालयाच्या आवारातच गोळीबार; कुख्यात गुन्हेगारासह तिघांचा मृत्यू