मुंबई - शहरातील रंग शारदा रिसॉर्टमधून मढ येथील 'रिट्रीट हॉटेल' येथे हलविण्यात आलेल्या शिवसेना आमदारांची आदित्य ठाकरे यांनी भेट घेतली आहे. महायुतीमधील भाजप आणि शिवसेना दोन्ही पक्षांनी मुख्यमंत्री पदावर दावा केला, यामुळे राज्यातील सत्ता स्थापनेचा पेच अद्यापही कायम आहे. याच पार्श्वभूमीवर कोणताही दगाफटका होऊ नये, म्हणून शिवसेनेने आमदारांना मढ येथील हॉटेलमध्ये ठेवले आहे.
हेही वाचा... हिंगोलीत शिवसैनिकांचे रास्ता रोको, महामार्गावर वाहनांच्या लाबंच लांब रांगा
महाराष्ट्रातील सरकार स्थापनेचा पेच अद्यापही कायम आहे. यात भाजप आणि शिवसेना यांच्यात सुरू असलेल्या वादात शिवसेनेला कोणताही फटका बसु नये, याची शिवसेनेकडून पुरेपुर काळजी घेण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवपर शिवसेनेच्या सर्व आमदारांना सुरूवातीला रंग शारदा आणि नंतर मढ येथील हॉटेल द रिट्रीट येथे हलवण्यात आहे. दरम्यान शिवसेना नेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी या सर्व आमदारांची भेट घेतली आहे. आदित्य ठाकरे रात्री उशिरा आमदारांना भेटण्यासाठी गेले.