मुंबई - मुंबईसह महाराष्ट्रात हिंदुत्व, भोंगा आणि हनुमान चालीसा ( Aaditya Thackeray on Loudspeaker ) यावरून राजकीय वातावरण तापले आहे. त्यातच पर्यावरण ( Aditya Thackeray on environment ) हा मुख्य प्रश्न म्हणून राजकारण्यांनी त्याचा विचार करावा, असे आवाहन पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे ( Aaditya Thackeray news Mumbai ) यांनी केले आहे. तसेच, भोंग्याबाबत सुप्रीम कोर्टाच्या ( Aaditya Thackeray on supreme court over loudspeaker ) आदेशांचे पालन केले जाईल, असेही त्यांनी सांगितले.
राजकारण्यांनी विचार करावा - हवामानातील बदल आणि भौगोलिक ( Aaditya Thackeray on Loudspeaker news Mumbai ) व इतर कारणांनी जगभरातील शहरांना वेगवेगळ्या समस्यांना सामोरे जावे लागते आहे. मुंबई महानगराला देखील पावसाळ्यात अतिवृष्टीप्रसंगी पूरस्थितीचा सामना करावा लागतो. या अनुषंगाने मुंबईतील पूर जोखीम, वेगवेगळ्या घटकांवर त्याचे होणारे परिणाम व संभाव्य उपाययोजना या विषयी विचारविनिमय आणि मार्गदर्शन करण्यासाठी (आज २८ एप्रिल आणि उद्या २९ एप्रिल) दोन दिवसीय कार्यशाळेचे ( Aaditya Thackeray at Sahyadri State Guest House Mumbai ) आयोजन सह्याद्री राज्य अतिथीगृह (वाळकेश्वर) येथे करण्यात आले आहे. या कार्यशाळेचे उद्घाटन आदित्य ठाकरे यांच्या हस्ते झाले. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
मुंबईत 15 ते 16 प्लॅनिंग ऑथोरिटी आहेत. एकच प्लॅनिंग ऑथोरिटी असल्यास काम करणे सोपे असते. राज्यात आघाडी सरकारमध्ये समन्वय असल्याने काम एकत्रित केले जात आहे. पर्यावरण हा मुख्य प्रश्न म्हणून राजकारण्यांनी विचार करावा व त्यासाठी सर्व पक्षांनी एकत्र येवून प्लॅनिंग केली पाहिजे, असे आदित्य ठाकरे म्हणाले.
सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचे पालन - मनसेकडून करण्यात आलेल्या ट्विटबाबत बोलताना, मी ट्विट बघितलेले नाही. भोंग्याबाबत सुप्रीम कोर्टाने दिलेल्या आदेशानुसार आपण नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. शाळा, सार्वजनिक ठिकाणे येथे सुरक्षित वातावरण निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. याकरिता चर्चा सुरू आहे. समृद्धी महामार्गावर झालेली घटना दुःखदायक आहे. राज्य सरकार सर्व समाजबांधवांसाठी काम करत आहे. जीएसटी थकबाकी येणे अजून बाकी आहे. कॅबिनेटमध्ये यावर चर्चा करण्यात येईल, असे आदित्य ठाकरे म्हणाले.
हेही वाचा - Maharashtra Day : महाराष्ट्र दिनी देवेंद्र फडणवीस देणार 'बुस्टर डोस'! - आशिष शेलार