ETV Bharat / city

अव्वाच्या सव्वा शालेय शुल्क वसुली पडणार महागात.. तक्रारीसाठी सरकारने जाहीर केले पत्ते अन् फोन नंबर

अतिरिक्त शालेय शुल्क वसूल करणाऱ्या शैक्षणिक संस्थांविरोधात तक्रारी करण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने पालकांसाठी पुर्नरिक्षण समिती व विभागीय शुल्क नियामक समित्या गठीत केलेल्या आहेत. सर्व समित्यांच्या पदसिध्द सदस्य सचिवांना समित्यांचे कामकाज तात्काळ सुरू करण्याबाबत सूचना देण्यात आलेल्या आहेत.

school Fee Regulatory Committee
school Fee Regulatory Committee
author img

By

Published : Jul 13, 2021, 7:22 PM IST

मुंबई - अव्वाच्या सव्वा शालेय शुल्क वसूल करणाऱ्या शैक्षणिक संस्थांविरोधात तक्रारी करण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने पालकांसाठी पुर्नरिक्षण समिती व विभागीय शुल्क नियामक समित्या गठीत केलेल्या आहेत. सर्व समित्यांच्या पदसिध्द सदस्य सचिवांना समित्यांचे कामकाज तात्काळ सुरू करण्याबाबत सूचना देण्यात आलेल्या आहेत. तसेच पालकांना तक्रारीसाठी शुल्क नियामक समिती यांचे सविस्तर पत्ते, ई-मेल व दूरध्वनी क्रमांक सुद्धा जाहीर करण्यात आले आहेत. यामुळे आता अतिरिक्त शालेय शुल्क वसूल करणाऱ्या शाळांविरोधात तक्रारी करणे पालकांना शक्य होणार आहे.

समित्या गठीत -

महाराष्ट्र शैक्षणिक संस्था (शुल्क विनियमन) अधिनियम, अंतर्गत उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती ए.एम.ढवळे यांच्या अध्यक्षतेखाली पुर्नरिक्षण समिती गठित करण्यात आली असून या पुर्नरिक्षण समितीमध्ये सनदी लेखापाल व सेवा निवृत्त शिक्षण संचालक यांची सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. याबरोबरच पुर्नरिक्षण समितीचे गठण पूर्ण झाले असून मुंबई, पूणे, नाशिक, नागपूर, औरंगाबाद या पाच विभागांसाठी विभागीय शुल्क नियामक समित्याही गठित करण्यात आल्या आहेत, असे परिपत्रक शालेय शिक्षण विभागाने निर्गमित केले आहे. गठित करण्यात आलेल्या पुर्नरिक्षण समिती व विभागीय शुल्क नियामक समितींच्या अधिसूचना महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिध्द करण्यात आलेल्या आहेत. सर्व समित्यांच्या पदसिद्ध सदस्य सचिवांना समित्यांचे कामकाज तात्काळ सुरू करण्याबाबत सूचना देण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे ज्या शाळांनी शालेय शुल्क वाढ केली आहे. अशा शाळांच्या निर्णयाविरूद्ध पालकांना शुल्क वाढीबाबत आता अपिल करता येणार आहे.

या ठिकाणी करता येणार तक्रारी -

* पुर्नरिक्षण समिती राज्य स्तर, मुंबई साठी जवाहर बालभवन, नेताजी सुभाष मार्ग, चर्नी रोड (पश्चिम),मुंबई दूरध्वनी क्रमांक मुंबई- (०२२) २३६३००८१,४००००४, २३६३००९०, २३६३००८६ ई-मेल: dydemumbai@yahoo.com

विभागीय शुल्क नियामक समिती -

• मुंबईः जवाहर बालभवन, नेताजी सुभाष मार्ग, चर्नी रोड (पश्चिम), मुंबई-४००००४ (०२२) २३६३००८, २३६३००८६ ई- मेल: dydemumbai@yahoo.com

• पुणेः १७, डॉ. आंबेडकर मार्ग, लाल देवळाजवळ पुणे-४११००१ (०२०) २६१२२२१७, २६१२५६९६, २३६३००९० ई-मेल: dydpune@gmail.com

• नाशिकः विभागीय आयुक्त कार्यालय आवार, जेत रोड, नाशिक रोड, नाशिक- ४२२१०१ (०२५३)२४५४९१० ई-मेल: dydnashik@gmail.com

• नागपूरः बालभारती, धंतोली गार्डन जवळ, धंतोली नागपूर- ४४००१२ (०७१२) २४२१३९८ ई-मेल:dydnagpur@rediffmail.com

• औरंगाबादः मुलींचे आयआयटी जवळ, भडकल गेट मीपा परिसर, औरंगाबाद-४३१००१ (०२४०) २३३६३१८/ - २३३४३७९ ई-मेल: rmsadydeaurngabad@gmail.com

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.