मुंबई - नव्या ओमायक्रॉन व्हेरियंटने ( Omicron variant ) संपूर्ण जगाची चिंता वाढवली आहे. ओमायक्रॉनचा (Omicron) आता भारतात शिरकाव झाला आहे. त्यामुळे कोरोना नियमावलीमध्येही काही प्रमाणात बदल करण्यात आले आहेत. कोरोना लसीकरणासाठी केंद्र व राज्य सरकारकडूनही वारंवार आवाहन केले जात आहे. सध्या 18 वर्षाच्या पुढील प्रत्येकाला लस देण्यात येत आहे. तर आता तीन वर्षाच्या पुढील मुलांनाही कोरोना लस मिळणार असल्याची माहिती सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ (CEO Of Serum Institute of India) अदर पुनावाला ( Adar Poonawalla ) यांनी दिली आहे. सीआयआय पार्टनरशिप समिटमध्ये ( Confederation of Indian Industry ) बोलताना अदर पुनावाला यांनी ही माहिती दिली आहे. पुढील सहा महिन्यात तीन वर्षाच्यावरील मुलांसाठी कोरोना लस विकसीत केली जाईल, असेही पुनावाला यांनी सांगितले आहे.
हेही वाचा - Omicron in Maharashtra : राज्यात एकूण ओमायक्रॉन रुग्णांची संख्या 20; कुठे किती रुग्ण?