ETV Bharat / city

अभिनेत्री सई ताम्हणकरकडून कोरोनाग्रस्तांसाठी दीड लाखांची मदत

कोरोना विषाणूशी लढा देण्यासाठी सामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत मदतीचा ओघ येत आहे. यात आता मराठी अभिनेत्री सई ताम्हणकरने मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये 1.5 लाख रुपये जमा केले आहेत.

अभिनेत्री सई ताम्हणकरने कोरोना ग्रस्तांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमाकेली मदत

author img

By

Published : Mar 30, 2020, 9:37 PM IST

मुंबई - कोरोना विषाणूशी लढा देण्यासाठी सामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत मदतीचा ओघ येऊ लागला आहे. अनेक बॉलिवूड व दाक्षिणात्य कलाकारांनी आर्थिक मदत केली. त्यात आता मराठी अभिनेत्री सई ताम्हणकरची भर पडली आहे. सईने मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये १.५ लाख रुपये जमा केले आहेत. सई ताम्हणकर ने केलेल्या या मदतीने मराठी चित्रपटससृष्टी समोर नवा पायंडा पाडला आहे.

कोरोना विषाणूने संपूर्ण जगासमोर आव्हान निर्माण केले आहे. देशभरात २१ दिवसांचा लॉकडाऊन घोषित करण्यात आला असला तरी करोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. देशातील करोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या १ हजार २४ झाली असून, आतापर्यंत २७ जणांचा मृत्यू झाला आहे. यापैकी ९६ जणांची प्रकृती बरी झाल्याने घरी सोडण्यात आल्याचे आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.