मुंबई: घुसखोरी आणि मारहाणीच्या २०१३ मध्ये केलेल्या फौजदारीच्या तक्रारीतून दोषमुक्त करण्यासाठी अभिनेता सुनील शेट्टी यांनी मुंबई उच्च न्यायालयात केलेल्या याचिकेवर ऑगस्टमध्ये सुनावणी होणार आहे. गिरगावमध्ये सुनील शेट्टी यांच्या वडिलांच्या मालकीच्या हॉटेलवर सुनील आणि अन्य पाच जणांनी तेथील व्यावसायिक भाडेकरूला मारहाण केल्याचा आरोप आहे. तक्रारदार इंटरनॅशनल क्युजिन्स यांनी या सर्वांविरोधात व्ही. पी. रोड पोलिस ठाण्यात तक्रार केली होती मात्र त्याची दखल घेतली नाही. त्यामुळे त्यांनी महानगर दंडाधिकारी न्यायालयात 2014 मध्ये तक्रार केली. न्यायालयाने यावर कारवाई सुरू केली आहे; परंतु या तक्रारीमधून दोषमुक्त करण्यासाठी शेट्टी यांनी याचिका केली आहे. यावर सोमवारी न्या. नितीन जामदार आणि एन. आर. बोरकर यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. जर शेट्टी यांनी दंडाधिकारी न्यायालयात अर्ज केला तर ही सुनावणी 3 आठवड्यानंतर घ्यावी असे निर्देश न्यायालयाला दिले आहेत.
Sunil Shetty in High Court : दोष मुक्त करण्याच्या मागणीसाठी अभिनेता सुनील शेट्टी उच्चन्यायालयात - मुंबई उच्च न्यायालयात
बॉलीवूड अभिनेता सुनील शेट्टी (Actor Sunil Shetty) कडून मुंबई उच्च न्यायालयात (Bombay High Court) धाव घेतली आहे सुनील शेट्टी वर 2013 मध्ये मारहाणी प्रकरणात दाखल करण्यात आलेल्या फौजदारी एफआयआर मधून दोष मुक्त करण्यात ( Demands for acquittal) यावे यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली असून या याचिकेवर पुढील सुनावणी ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होणार आहे