मुंबई - महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या भेटीवरुन राजकीय आरोप-प्रत्यारोप होत आहेत. त्यातच आज प्रसिद्ध अभिनेते सोनू सूद यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवन येथे सदिच्छा भेट घेतली. स्थलांतरित लोकांना त्यांच्या मूळ राज्यात पोहोचवण्यासाठी तसेच लाखो लोकांच्या भोजन व्यवस्थेसाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांची सूद यांनी राज्यपालांना माहिती दिली.
सोशल मीडियाच्या माध्यमातून अभिनेते सूद हे सध्या परप्रांतीय मजुरांसाठी देवदूत ठरत आहेत. त्यामुळे त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. राज्यपाल कोश्यारी यांनी मध्यंतरी त्यांना फोन करून विचारपूस केली होती. आज राज्यपालांनी सूद यांचे कौतुक करून त्यांना त्यांच्या कार्यात सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.