मुंबई - अभिनेत्री शिल्पा शेट्टी व तिचा पती राज कुंद्रा यांनी अभिनेत्री शर्लिन चोप्रा विरुद्ध 50 कोटींचा मानहानीचा दावा दाखल केला आहे. शर्लिन चोप्राने राज कुंद्रा व शिल्पा शेट्टी यांच्याविरुद्ध लैंगिक शोषण व फसवणुकीची तक्रार दाखल केली होती. अनेक वेळा इशारे दिल्यानंतर शिल्पा व राज कुंद्रा यांनी ही तक्रार दाखल केली आहे.
एप्रिल 2021 मध्ये शर्लिनने राज कुंद्राविरोधात लैंगिक छळासाठी एफआयआर दाखल केला होता. भारतीय दंड संहितेच्या कलम 67, 67 (अ), माहिती तंत्रज्ञान कायदा 2008, महिलांचे अभद्र प्रतिनिधित्व अधिनियम 1986 चे कलम 376 अन्वये हा आरोप करण्यात आला होता.
राज कुंद्राविरोधात पोलिसात तक्रार
अभिनेत्री आणि मॉडेल शर्लिन चोप्रा हिने जुहू पोलीस स्टेशन गाठले होते. प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राविरोधात तक्रार दाखल करण्यासाठी शर्लिन तिच्या वकिलांसह पोलीस स्टेशनमध्ये 14 ऑक्टोबरला आली होती. शर्लिनच्या म्हणण्यानुसार, राज कुंद्राने तिच्या कामाचे पैसे अद्याप परत केलेले नाहीत. या कारणास्तव तिला राज कुंद्राविरोधात मुंबई पोलिसात एफआयआर नोंदवायचा आहे.
शर्लिनने मुख्यमंत्र्यांकडे मागितली मदत -
राज कुंद्राविरोधात एप्रिल महिन्यातही शर्लिन चोप्राने पोलिसात तक्रार अर्ज केला होता. त्यावरही कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे शर्लिनने आता एक व्हिडिओ जारी करत मुख्यमंत्र्यांकडे मदतीची विनंती केली आहे. तसेच त्या प्रकरणात एफआयआर नोंदवण्याची मागणीही शर्लिनने पोलिसांकडे केली आहे. शर्लिन शेवटी हा व्हिडिओ बनवताना भावनिक झाली असल्याचे दिसत आहे.
काय आहे नेमके प्रकरण -
राज कुंद्रा हा पोर्नोग्राफी फिल्मच्या गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार मानला जात आहे. राज कुंद्राची व्हिआन नावाची कंपनी असून तिचे केनरीन नावाच्या कंपनीसोबत टायप होते. केनरीन ही कंपनी लंडन स्थित आहे. राज कुंद्राच्या भावजीच्या मालकीची ही कंपनी आहे. त्याचे हॉट शॉट्स नावाचे एक अॅप होते. या कंपनीचे सर्व कॉन्टेंटची निर्मिती, या अॅपचे ऑपरेशन्स, अकाउंटिंग राज कुंद्राच्या मालकीच्या व्हिआन या कंपनीच्या मुंबईतील ऑफिसमधूनच होत होते. या प्रकरणाचा सखोल तपास करीत असताना हे सर्व धागेदोरे सापडले आहेत. यामध्ये काही व्हॉट्सअप ग्रुप, ई-मेल्स, अकाऊंट शीट्स सापडल्या आहेत. मुंबई पोलिसांच्या प्रॉपर्टी सेलने पोर्नोग्राफी तयार करण्याच्या गुन्ह्यात राज कुंद्रासह 11 आरोपींना अटक केली आहे.
काय होते शर्लिनचे आरोप?
शर्लिन चोप्राने 14 ऑक्टोबर रोजी राज आणि शिल्पाविरोधात एफआयआर दाखल केली. शर्लिनने फसवणूक आणि मानसिक छळ केल्या प्रकरणी ही तक्रार दाखल केली होती. शर्लिनने राज कुंद्राविरोधात तक्रार दाखल करत म्हटलं होतं की, मी जेएल स्ट्रीम कंपनीसाठी तीन व्हिडिओ शूट केले होते, पण मला वचन दिल्याप्रमाणे पैसे दिले गेले नाहीत. मुलींना त्यांचं शरीर दाखवण्याचे पैसे देऊन तुम्ही त्यांचे पैसे का देत नाही, तुम्ही त्यांची फसवणूक का करता? तुम्ही त्यांना टोपी का घालता? हा नैतिक व्यवसाय आहे का? असा सवाल शर्लिनने केला होता.
शिल्पा आणि राज यांची शर्लिन चोप्राविरोधात काय तक्रार?
शिल्पा शेट्टीने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, तिचा जेएल प्रवाहाशी काहीही संबंध नाही. अश्लील चित्रपट बनवल्याबद्दल राज कुंद्राला अटक करण्यात आली. तो सध्या जामीनावर बाहेर आहे. गेल्या काही महिन्यांत शर्लिनने राज कुंद्रावर धक्कादायक आरोप केले होते. शर्लिन म्हणाली होती की, राज कुंद्रा यांनीच तिला अश्लिल उद्योगात आणलं.
एप्रिल 2021 मध्ये शर्लिनने राज कुंद्रावर लैंगिक शोषणाचा आरोप करत एफआयआर दाखल केली. शर्लिनने सांगितलं होतं की, राज कुंद्रा 27 मार्च २०१९ रोजी तिला न सांगता बिझनेस मीटिंगनंतर तिच्या घरी आला होता. शर्लिनने आरोप केला की, राजने तिच्यावर जबरदस्ती करण्यास सुरुवात केली, तर ती असं करण्यास नकार देत राहिली.