ETV Bharat / city

Salman Khan Meet Mumbai CP : अभिनेता सलमान खान मुंबईच्या पोलीस आयुक्तांच्या भेटीला; बंदुकीच्या परवान्यासाठी केला अर्ज - मुंबई वांद्रे पोलीस

हिंदी चित्रपटसृष्टीतील आघाडीचा अभिनेता सलमान खान याने मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांची आयुक्त कार्यालयात जाऊन भेट घेतली. बंदुकीच्या परवान्यासाठी सलमान खान याने मुंबई पोलीस आयुक्तांची भेट घेतल्याचे बोलले जाते. मागील काही दिवसांपूर्वी सलमान खानला धमकीचे पत्र आले होते. याची गंभीर दखल पोलीस प्रशासनाने घेतली होती. कदाचित त्याच पार्श्वभूमीवर स्वसंरक्षणासाठी सलमान बंदुकीचा परवाना मागितला असेल.

Actor Salman Khan
अभिनेता सलमान खान
author img

By

Published : Jul 22, 2022, 7:45 PM IST

Updated : Jul 23, 2022, 12:35 PM IST

मुंबई : बॉलीवूडचा भाईजान अभिनेता सलमान खानने आज मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांची मुंबई पोलीस आयुक्त कार्यालयात भेट घेतली आहे. यादरम्यान सलमान खानकडून बंदुकीच्या परवान्याची मागणीसाठी अर्ज केला होता. सलमान खानला गेल्या महिन्यात आलेल्या धमकीनंतर आज पोलीस आयुक्तांची भेट घेतली आहे.

मुसेवालानंतर मिळाली धमकी : अभिनेता सलमान खानला पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला यांच्या हत्येनंतर काही दिवसांपूर्वी बॉलिवूड अभिनेता सलमान खानलादेखील धमकी मिळाली होती. या धमकीनंतर त्याने स्वत:च्या संरक्षणासाठी शस्त्र परवान्यासाठी अर्ज केला आहे. यासंदर्भात आज सलमान खानने मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांची भेट घेतली.

सलमान खानला आलेल्या धमकीसंदर्भात जाणून घेतले : आयुक्तांनी त्याच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न केला की, त्याला कोणत्या प्रकारच्या धमक्या आल्या आहेत आणि त्यानंतर सलमान खानला त्याच्या सुरक्षेबद्दल माहिती देण्यात आली. गँगस्टर लॉरेन्स बिष्णोई याच्याकडून नुकतीच सलमान खानला धमकी मिळाली होती. या वेळी सलमान आणि त्याचे वडील सलिम खान यांची चौकशी झाली होती. दरम्यान पोलिस आयुक्तांसोबतची ही भेट त्यासंदर्भात आहे का? की सदिच्छा भेट आहे, हे अद्याप कळू शकलेले नाही.

पत्रात सिद्धु मुसेवालाप्रणाणे हत्या करण्याची धमकी : सलीम मॉर्निंग वॉकनंतर ज्या ठिकाणी बसायला जातात तिथे सलीम खान यांच्या गार्डला हे पत्र सापडले. सलमान खान लवकरच तू सिद्धू मूसवालासारखा होशील, असे धमकीच्या पत्रात लिहिले होते. या प्रकरणी मुंबईच्या वांद्रे पोलिसांनी एफआयआर नोंदवला होता. पोलिसांनी भादंवि कलम 506 अन्वये गुन्हा दाखल केला होता. सिद्धू मुसेवालाच्या हत्येनंतर सलमानला धमकीचे पत्र मिळाल्यानंतर संपूर्ण बॉलिवूडमध्ये खळबळ उडाली आहे. याबाबत सातत्याने अपडेट्स येत आहेत. याप्रकरणी पोलीसही आता अलर्ट मोडमध्ये असून, या संपूर्ण प्रकरणाचा गांभीर्याने तपास करीत आहेत.

हेही वाचा : Umesh Kolhe Murder Case : उमेश कोल्हे हत्या प्रकरणातील सर्व आरोपींना 5 ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी

Last Updated : Jul 23, 2022, 12:35 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.