मुंबई - मराठी चित्रपट सृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांचे निधन झाले (Actor Ramesh Deo passed away) आहे. ते 93 वर्षांचे होते. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाल्याची माहिती रमेश देव यांचे चिरंजीव आणि अभिनेते अजिंक्य देव (Ajikya Deo) यांनी दिली आहे. 30 जानेवारी रोजी त्यांनी आपला 93 वा वाढदिवस साजरा केला होता. त्यांच्या निधनामुळे मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतून शोक व्यक्त करण्यात येत आहे.
- ....म्हणून देव नाव पडले -
रमेश देव यांचा जन्म 30 जानेवारी 1929 रोजी कोल्हापूर येथे झाला होता. ते मूळचे राजस्थानातील जोधपूरचे, ठाकूर घराण्यातील. राजर्षी शाहू महाराज यांच्यामुळे त्यांचे नाव 'देव’ झाले. एका न्यायालयीन कामकाजात रमेश देव यांच्या वडिलांनी महाराजांना मदत केली होती त्यावेळी महाराज म्हणाले, तुम्ही ठाकूर नाही तर देव आहात, तेव्हापासून देव हे नाव रूढ झाले. रमेश देव यांचा विवाह प्रसिद्ध अभिनेत्री सीमा यांच्याबरोबर झाला होता.
- 30 जानेवारीला 93वा वाढदिवस केला होता साजरा -
ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांनी आपली पूर्ण हयात सिनेमा आणि अभिनयाला समर्पित केली होती. 30 जानेवारील 1929 रोजी त्यांचा जन्म झाला होता. दोन दिवसांपूर्वीच त्यांनी आपला 93वा वाढदिवस साजरा केला होता. रमेश देव (Ramesh Deo) यांनी मराठी तसेच हिंदी भाषेतील अनेक सिनेमांमध्ये काम केले. त्यांनी 1962 मध्ये अभिनेत्री नलिनी सराफ (सीम देव) (Seema Deo) यांच्यासोबत लग्न केलं होते.
- रमेश देव यांनी आतापर्यंत 280 पेक्षा जास्त चित्रपटामध्ये केले काम -
रमेश देव यांनी आतापर्यंत 280 पेक्षा जास्त चित्रपटामध्ये काम केले आहे. रमेश देव यांनी चित्रपटसृष्टीत आपला काळ गाजवला. फक्त मराठीच नव्हे तर बॉलिवूडमध्येही रमेश देव यांनी दर्जेदार भूमिका केल्या होत्या. रमेश देव यांनी चित्रपट, रंगभूमी आणि दूरदर्शन अशा तीनही माध्यमातून प्रदीर्घ काळ मराठी चित्रपट सृष्टीत विविध भूमिका साकारल्या. रमेश देव यांनी चित्रपट सृष्टीत पदार्पण एक पाहुणा कलाकार म्हणून केले. निर्माते आणि दिग्दर्शक दिनकर पाटील यांच्या ‘रामराम पाव्हणं’ या १९५० साली प्रदर्शित झालेल्या चित्रपटात रमेश देव यांना छोटीशी भूमिका साकारली होती. दिनकर पाटील यांच्याच ‘पाटलाचा पोर’ या चित्रपटात भूमिका साकारली. रमेश देव यांनी संख्या चित्रपट काम केले. १९५६ साली राजा परांजपे यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘आंधळा मागतो एक डोळा’ या सिनेमातून त्यांनी अभिनेता म्हणून खऱ्या अर्थाने आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली होती. 'आरती' हा त्यांचा बॉलीवूडमधील पहिला चित्रपट होता.
रमेश देव यांनी 2013 मध्ये “जॉली एलएलबी” चित्रपटात 'कौल साहब' ही भूमिका साकारली होती. 2016 मध्ये त्यांनी ‘घायल वन्स अगेन’ चित्रपटात काम केले होते. रमेश देव यांनी स्वत:चे प्रोडक्शन हाऊससुद्धा उभारले आहे. या प्रोडक्शन हाऊसमधून त्यांनी अनेक सिनेमाची निर्मिती केली होती. त्यांनी २०११ मध्ये ‘दिल्ली बेली’ या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. रमेश देव यांना जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले होते.