ETV Bharat / city

चित्रिकरणादरम्यान अभिनेते मिलिंद शिंदेंवर बेतला होता जीवघेणा प्रसंग, ऑपरेटरच्या प्रसंगावधानामुळे अनर्थ टळला - Milind Shinde

सिनेमाच्या चित्रिकरणादरम्यान, अभिनेते मिलिंद शिंदे हे एका संकटातून वाचल्याची घटना नुकतीच घडली आहे. चित्रिकरणादरम्यान ज्या बाजूने क्रेन खाली येत होते. त्याच दिशेवर शिंदे उभे होते. मात्र, क्रेन ऑपरेटरने प्रसंगावधान राखल्याने यावेळी मोठा अनर्थ टळला आहे.

अभिनेते मिलिंद शिंदे
अभिनेते मिलिंद शिंदे
author img

By

Published : Aug 7, 2021, 5:47 PM IST

मुंबई - मराठी सिनेमाच्या चित्रिकरणादरम्यान, अभिनेते मिलिंद शिंदे हे एका संकटातून वाचल्याची घटना नुकतीच घडली आहे. सिनेमाच्या चित्रिकरणादरम्यान ज्या बाजूने क्रेन खाली येत होते, त्याच दिशेवर शिंदे उभे होते. मात्र, क्रेन ऑपरेटरने प्रसंगावधान राखल्याने मोठा अनर्थ यावेळी टळला आहे.

ऑपरेटरला तत्काळ लक्षात आले

नेहमीप्रमाणे मिलिंद शिंदे आपल्या भूमिकेमध्ये मग्न होऊन सराव करत होते. त्यावेळी आजूबाजूला त्यांचे लक्ष नव्हते. सेटवर जिमी-जीब कॅमेराचा सेटअप लावलेला होता. एका सीनसाठी जिमी-जीब क्रेनचे वेगाने खाली येत होते, ज्या दिशेने मिलिंद शिंदे उभे होते. मात्र, हे क्रेन नियंत्रित करणाऱ्या ऑपरेटरला शिंदे उभे असल्याचे तत्काळ लक्षात आल्याने, त्याने क्रेन नियंत्रित केले. त्यामुळे शिंदे यांच्याबाबत घडणारा मोठा अनर्थ टळला.

'मला खरचटलेही नाही'

"क्रेन खाली येत असताना मी जर खाली झुकलो नसतो, तर मला गंभीर दुखापत झाली असती. पण, सेटवरच्या सकारात्मक ऊर्जेमुळे मला खरचटलेली नाही. एखादे चांगले काम आपल्या हातून घडत असेल, तर तेव्हा संकटाची सावलीदेखील आपल्यावर पडत नाही, अशी भावना शिंदे यांनी यावेळी व्यक्त केली आहे.

'ऑपरेटरचे प्रसंगावधान'

ऑपरेटरने प्रसंगावधान दाखवून ती क्रेन नियंत्रित केली, म्हणून मोठा अनर्थ टळला. ‘सेटवर घडलेल्या या घटनेत सुदैवाने मिलिंद शिंदे यांना काही दुखापत झाली नाही. सेटवर काम करत असलेल्या सहकाऱ्यांच्या प्रसंगावधानामुळे धोका थोडक्यात टळला, असे चित्रपटाचे दिग्दर्शक शैलेश नरवाडे यांनी सांगितले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.