ETV Bharat / city

Manwa Naik : अभिनेत्री मनवा नाईकसोबत कॅब चालकाने केले गैरवर्तन; मुंबई पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली

author img

By

Published : Oct 16, 2022, 8:30 PM IST

Updated : Oct 16, 2022, 10:31 PM IST

नुकतेच मुंबईतील एका उबर कॅब चालकाने अभिनेत्री आणि चित्रपट दिग्दर्शक मनवा नाईकसोबत गैरवर्तन (Manwa Naik Driver Misbehave) केले आहे. एवढेच नाही तर कॅब चालकाने तिला धमकीही दिली आहे. अभिनेत्रीने शनिवारी रात्री घरी जाण्यासाठी वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स येथून उबर कॅब घेतली. यादरम्यान कॅब चालकाने तिच्याशी गैरवर्तन केले (Uber Cab Driver Misbehaved) तसेच मार्गात सिग्नलवर वाहतूक पोलिसाशी वाद घातला.

Manwa Naik Driver Misbehave
Manwa Naik Driver Misbehave

मुंबई : नुकतेच मुंबईतील एका उबर कॅब चालकाने अभिनेत्री आणि चित्रपट दिग्दर्शक मनवा नाईकसोबत गैरवर्तन (Manwa Naik Driver Misbehave) केले आहे. एवढेच नाही तर कॅब चालकाने तिला धमकीही दिली आहे. अभिनेत्रीने शनिवारी रात्री घरी जाण्यासाठी वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स येथून उबर कॅब घेतली. यादरम्यान कॅब चालकाने तिच्याशी गैरवर्तन केले (Uber Cab Driver Misbehaved) तसेच मार्गात सिग्नलवर वाहतूक पोलिसाशी वाद घातला. खुद्द अभिनेत्रीने तिच्या फेसबुक पोस्टद्वारे ही माहिती दिली आहे. मात्र, मुंबई पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच, या प्रकरणाची गंभीर दखल घेत मुंबई पोलीस त्याचा तपास करत आहेत. याप्रकरणाचा झोन 8 चे डीसीपी तपास करत असल्याची माहिती मुंबईचे जॉइंट सीपी यांनी दिली. Mumbai Crime, latest news from Mumbai

  • Maharashtra | Actor & director Manava Naik alleged in a Facebook post that a cab driver threatened & misbehaved with her while she was on her way home in taxi yesterday

    Serious cognisance taken. DCP zone 8 is working on it and the culprit will be booked soon: Mumbai Jt CP (L&O)

    — ANI (@ANI) October 16, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

Maharashtra | Actor & director Manava Naik alleged in a Facebook post that a cab driver threatened & misbehaved with her while she was on her way home in taxi yesterday

Serious cognisance taken. DCP zone 8 is working on it and the culprit will be booked soon: Mumbai Jt CP (L&O)

— ANI (@ANI) October 16, 2022

कॅब ड्रायव्हरचे गैरवर्तन - अभिनेत्रीने तिच्या फेसबुक पोस्टमध्ये लिहिले की, 'मी रात्री 8.15 वाजता वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्समधून उबर कॅब घेतली. बीकेसी (वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स) येथे उबर चालकाने फोनवर बोलणे सुरू केले. ज्यावर मी त्याच्याशी फोनवर बोलण्यास नकार दिला. यानंतर त्याने बीकेसी सिग्नलही तोडला.' यासाठी तिने कॅब ड्रायव्हरला असे न करण्यास सांगितले होते, मात्र त्याने ऐकले नाही. सिग्नल तोडल्यानंतर वाहतूक पोलिसांनी कॅब चालकाला थांबवून कॅबचा फोटो काढला. त्यावर कॅब चालकाने वाहतूक पोलिसांशी हुज्जत घालण्यास सुरुवात केली.

तेरे को दिखा देता हू - तुम्ही वाहनाचा फोटो काढला आहे, असे सांगून अभिनेत्रीने वाहतूक पोलिसांना वाद संपवण्यास सांगितले. आता जाऊ द्या, पण यावर उबर चालकास राग आला आणि त्याने अभिनेत्रीशी गैरवर्तन केले आणि सांगितले की, तू 500 रुपये देशील, ज्यावर अभिनेत्रीने तू फोनवर बोलत असल्याचे सांगितले. नंतर उबर चालकाने पुढे जाऊन रुक्ष तेरे को दिखा देता हू असं म्हणून अभिनेत्रीला धमकावले.. त्यावर अभिनेत्रीने कॅब ड्रायव्हरला कॅब पोलिस स्टेशनला नेण्यास सांगितले, मात्र त्याने जिओ गार्डनजवळ अंधारात कॅब थांबवली.

अभिनेत्रीने मानले पोलिसांचे आभार- अभिनेत्री आणि कॅब ड्रायव्हरमध्ये वाद सुरूच होता, ड्रायव्हर वेगाने कॅब चालवत होता. त्याने पुन्हा बीकेसी कुर्ला ब्रिजवर कॅब थांबवली. ज्यावर अभिनेत्रीने ड्रायव्हरला विचारले की, तू काय करणार आहेस. त्यावर त्याने सांगितले की, थांब दाखवतो काय करणार आहे ते!. मग, मनवा नाईकने उबर सुरक्षाला फोन केला. तर कस्टमर केअर पर्सनही कॉलवर होता. चुनाभट्टी रोडवरील प्रियदर्शनी पार्कपर्यंत कॅब चालकाने कॅबचा वेग वाढवला, नंतर मी कॅब थांबवण्यास सांगूनही तो थांबवत नव्हता आणि नंतर मी आरडाओरडा सुरु केला. आवाज ऐकून 2 दुचाकीस्वार आणि 1 रिक्षाचालकाने उबरला घेराव घातला आणि अभिनेत्रीला कारमधून सुरक्षित बाहेर पडली. मात्र या घटनेने ती घाबरली. त्यांच्या पोस्टवर मुंबईचे सहपोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी त्यांना आश्वासन दिले आणि लिहिले, 'मनवा जी, आम्ही या गंभीर घटनेची गंभीर दखल घेतली आहे! DCP झोन 8 यावर काम करत असून लवकरात लवकर दोषीला अटक करतील.'' त्याबद्दल अभिनेत्रीने विश्वास नांगरे पाटील यांचे आभार मानले.

Last Updated : Oct 16, 2022, 10:31 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.