मुंबई - अमली पदार्थ तस्करीच्या संदर्भात डीआरआयकडून कारवाई करण्यात आली. यामध्ये 504 ग्रॅम कोकेन हस्तगत करण्यात आले. त्रिनिदाद व टोबॅगोवरून कुरियरच्या माध्यमातून एका इस्त्रीमध्ये हे अमली पदार्थ लपवून मुंबईत पाठवण्यात येणार आहेत, अशी गुप्त माहिती डीआरआयला मिळाली होती. त्यानंतर डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी यासंदर्भात कारवाई केली.
मुंबईतील पत्ता संशयास्पद -
या अमली पदार्थाची डिलिव्हरी मुंबईतील ज्या पत्त्यावर होणार होती. तो पत्ता संशयास्पद आढळून आला. हे कुरियर घेण्यासाठी एक महिला आली होती. डीआरआय अधिकाऱ्यांनी या महिलेला ताब्यात घेऊन चौकशी केली. चौकशीदरम्यान ही महिला अमली पदार्थ नवी मुंबईतील 2 आफ्रिकन व्यक्तीना देणार होती. यानंतर अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतलेल्या महिलेला नवी मुंबईतील दिलेल्या पत्त्यावर नेले. दरम्यान, त्या ठिकाणी 2 अफ्रिकन आरोपींना अटक करण्यात आली.
मुख्य महिला आरोपीला उदयपूर येथून अटक -
डीआरआय'च्या पुढील तपासात आढळून आले की मुंबईत अंमली पदार्थांची तस्करी करणारी एक मुख्य आरोपी महिला आहे. ती उदयपूर येथे होती. त्या महिलेला अहमदाबाद येथील डीआरआयच्या टीमने उदयपूर येथे जाऊन 18 नोव्हेंबर रोजी अटक केली. महिलेला सध्या मुंबईत आणण्यात आले आहे.
ही महिला अभिलेखावरील गुन्हेगार असून यापूर्वी मुंबई पोलिसांकडून या महिला आरोपीला अमली पदार्थांच्या तस्करीसंदर्भात अटक करण्यात आली होती. याप्रकरणी डीआरआयकडून 2 भारतीय महिला व 2 आफ्रिकन नागरिकत्व असलेल्या आरोपींना अटक केली आहे.
ऑगस्ट ते नोव्हेंबरपर्यंत 20 कोटींच्या कोकेनची केली तस्करी -
मुंबईतील अटक करण्यात आलेल्या या 2 महिला आरोपीनी त्यांच्या टोळीच्या माध्यमातून ऑगस्ट 2020 पासून ते आतापर्यंत तब्बल 3 किलो कोकेनची तस्करी केली. याची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारात 20 कोटी रुपये असल्याचं समोर आले आहे.
हेही वाचा- "भाजपाला मुंबईवर ब्रिटिशांचा युनियन जॅक फडकवायचाय"