मुंबई मुकेश अंबानी यांना धमकी देणाऱ्या आरोपीला 20 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे 15 ऑगस्ट रोजी रिलायन्स हॉस्पिटलच्या फोनवर धमकी देण्यात आली होती आतंकवादी अफजलगुरू आहे, असे सांगून रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे चेअरमन मुकेश धीरूभाई अंबानी व त्यांचे दिवंगत वडील धीरूभाई अंबानी यांचे नावाने वारंवार अश्लील भाषेत शिवीगाळ करून जीवे ठार मारण्याची धमकी आरोपीने दिली होती असे पोलीस तपासात समोर आले आहे आरोपीने दहशतवादी अफझल गुरूचे नाव घेताच केंद्रीय आणि राज्य यंत्रणांनी समांतर तपास सुरू केला होता आरोपी विष्णू भूमिका यांनी एच एन रिलायन्स हॉस्पिटल इमर्जन्सी क्रमांक त्यावर नऊ वेळा फोन करून धमकी दिली होती विष्णू बिंदू भूमिक वय 56 याला बोरिवली येथून ताब्यात घेण्यात आले होते
रिलायन्स हाॅस्पिटलच्या फोनवर धमकी कलम 506 2 भादंविनुसार गुन्हा दी बी मार्ग पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे दिनांक 15/08/2022 रोजी 10.39 ते 15/08/2022 12.04 या काळात आरोपीने काॅल केले होते आरोपीने 15 ऑगस्ट रोजी रिलायन्स हॉस्पिटलच्या फोनवर धमकी देऊन अर्वाच्च्य भाषेत शिवीगाळ केलीहोती एचएन रिलायन्स हॉस्पिटल एसएसव्हीपी रोड ग्रँड रोड मुंबई येथील दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधून धमकी दिली होती फिर्यादी प्रिन्स ओमप्रकाश सिंग वय 38 वर्ष व्यवसाय नोकरी सिक्युरिटी मॅनेजर यांनी याबद्दल पोलिसांना माहिती दिली
केंद्रीय आणि राज्य तपास यंत्रणांनी तत्काळ तपासाची सूत्रे हलवली आरोपीने दहशतवादी अफझल गुरूचे नाव घेताच केंद्रीय आणि राज्य यंत्रणांनी समांतर तपास सुरू केला होता आरोपी विष्णू भूमिका यांनी एचएन रिलायन्स हॉस्पिटल इमर्जन्सी क्रमांक त्यावरती नऊ वेळा फोन करून धमकी दिली होती विष्णू बिंदू भूमिक वय 56 याला बोरिवली येथून ताब्यात घेण्यात आले आहे पोलिसांनी तत्काळ कारवाई करीत मुकेश अंबानी यांना धमकी देणाऱ्या आरोपीला 20 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे
-
#UPDATE | Mumbai: Court sends accused to Police custody till 20th August. DB Marg Police had presented the accused before Police today. https://t.co/MzBq4sBN99
— ANI (@ANI) August 16, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">#UPDATE | Mumbai: Court sends accused to Police custody till 20th August. DB Marg Police had presented the accused before Police today. https://t.co/MzBq4sBN99
— ANI (@ANI) August 16, 2022#UPDATE | Mumbai: Court sends accused to Police custody till 20th August. DB Marg Police had presented the accused before Police today. https://t.co/MzBq4sBN99
— ANI (@ANI) August 16, 2022
आरोपीच्या वकिलाने न्यायालयात केलेला युक्तीवाद आरोपी विष्णू भूमिका यांनी एचएन रिलायन्स हॉस्पिटल इमर्जन्सी क्रमांकावर नऊ वेळा फोन करून धमकी दिली होती. विष्णू बिंदू भूमिक वय 56 याला बोरिवली येथून ताब्यात घेतला होते. आरोपी विष्णू भूमिका यांच्या वकिलांनी कोर्टासमोर असा युक्तिवाद केला की, आरोपी मानसिक रुग्ण असून, 2013 पासून आरोपीवर उपचार सुरू आहेत. तसेच आरोपीवर झालेल्या अन्यायाला कुठेतरी ते जबाबदार असल्याचे त्याला वाटत असल्याने त्याने असे कृत्य केले असावे. तसेच, आरोपी विरोधात कलम 506 लावण्यात आली आहे. ते अत्यंत चुकीचे आहे.
न्यायालयात केलेला युक्तीवाद आरोपीने थेट मुकेश अंबानी यांना कुठल्याही प्रकारचा फोनवर धमकी दिली नसून, रुग्णालयातील फोनवर अशाप्रकारे धमकी दिले असल्याने त्यांच्या विरोधात लावण्यात आलेले ५०६ कलमसुद्धा चुकीचे असल्याचेदेखील न्यायालयात वकिलांकडून सांगण्यात आले. 2013 पासून आरोपी मनोरुग्ण, उपचार सुरू आहेत. फोन हाॅस्पिटलमध्ये केल्याने मोठ्या उद्योगपतींना केला नाही. तर तेथील व्यक्तीसाठी केला. पोलिसांनी खोटी केस उभी केली. पोलिसांकडूनही त्यावर युक्तीवाद झाला.
पोलिसांनी मांडली बाजू पोलिसांनी न्यायालयात सांगितले की, नेमके 15 आॅगस्टलाच का फोन केला. त्याचबरोबर मोठ्या व्यक्तीचे नाव घेऊन फोन कशासाठी केला. त्याचबरोबर दहशतवादीचे नाव घेऊन फोन करणे. त्याचबरोबर मुकेश अंबानींना धमकी देणे हे देशविघातक कृत्य असल्याने त्यांना 10 दिवस पोलीस कोठडीची मागणी पोलिसांकडून करण्यात आली.
हेही वाचा Heavy Rain in Mumbai मुंबईतील अंधेरी दादर वांद्रे सह इतर भागांत जोरदार पाऊस जनजीवन विस्कळीत